प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जागतिक संगीत दिन साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

 साकोली -प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जेष्ठ नाट्य कलावंत भूमाला ताई उईके यांच्या राहते घरी जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला.

       सुरुवातीला नटेश्वराच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सोबतच संगीत क्षेत्रात आवश्यक असणारे साहित्य तबला, ऑर्गन, पॅड, गिटार, टाळ ,ढोलक या साहित्याचे सुद्धा पूजन करण्यात आले.

      संगीतमय वातावरणात श्री गणेशाची नादी सादर करण्यात आली व भजन सुद्धा सादर करण्यात आले.

  या प्रसंगी जेष्ठ नाट्य कलावंत भूमालाताई उईके, प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले साकोली तहसील चे अध्यक्ष मनोज बोपचे, उपाध्यक्ष संजय टेम्भुरने, महासचिव ईश्वर धकाते, सचिव यशवंत बागडे, संचालक धनंजय धकाते, विनोद मुरकुटे, उमेश भोयर, पितांबर सूर्यवंशी, रोहित मांढरे,संदीप कोटांगले, गुड्डू बोरकर उपस्थित होते.