
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली – वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचलित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी योगामुळे होणारे फायदे सांगितले व त्याचबरोबर योगा केल्यानी आपण कश्याप्रकारे निरोगी आयुष्य जगू शकतो याची माहिती दिली.
धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकजण तणावाखाली राहतो. दिवसभर घर – ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि कामाची चिंता कायम तणावाचे कारण बनून राहते. तणावाचे कारण काहीही असले तरी आपल्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. चांगले जीवन जगण्यासाठी आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे.
तणाव आणि तणावातून मुक्त होण्यासाठी योगा हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिवस च्या कार्यक्रमाकरिता योग प्रशिक्षक म्हणून डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आसन व प्राणायाम करून दाखविले आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतले. विद्यार्थ्यांनी पण उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
योगा केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. योग्य प्रकारे योगा केल्याने शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यास मदत होते. योगामुळे नकारात्मक विचार दूर होतात , मन शांत होते आणि आपल्या मनातील गोंधळलेले विचार दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तणाव दूर होतो व मानसिक फायदा होतो. असे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, डॉ. राजश्री, प्रा.नीरज अतकरी, देवेंद्र इसापुरे, पुकराज लांजेवार, शाहीद सय्यद, दिव्या कुंभारे व महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .