निलय झोडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साकोली येथे मोठ्या उत्साहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी क्रीडाशिक्षक आर बी कापगते व योगशिक्षिका प्रा.स्वाती गहाणे यांनी योगासनाचे धडे गिरविले.
शरीर,मन, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योगा करणे महत्त्वाचे आहे. योगगुरु आर.बी.कापगते यांनी योगाचे विविध प्रकार सांगून प्रात्यक्षिके करून योगाचे महत्व त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
भारतीय संस्कृतीचा व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून बघितले जाते. दररोज सकाळी थोडा वेळ योग केला तर नक्कीच शरीर व बुद्धिमत्ता विकसित होऊन लक्ष केंद्रित होऊ शकतो. तसेच योगशिक्षिका प्रा. स्वाती गहाणे यांनी प्रार्थना, प्राणायाम, सूर्यनमस्कार करून दाखविले व शिक्षकांकडून प्रात्यक्षिके करवून घेतले. शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक स्थितीसाठी योगा आवश्यक आहे असे अनमोल विचार ठेवले.
या दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापिका आर.बी.कापगते, डी.एस. बोरकर ,एम.एम.कापगते तसेच विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.