ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली _ तालुक्यातील पोटेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच व ग्रामसवेकानी आपली मनमर्जी कारभार करीत नालीतील घाण _ कचरा बौद्ध बांधवांच्या धार्मिक जागेवर दिक्षाभुमीत नेवून टाकल्यामुळे बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या असुन ग्रामपंचायत प्रशासन व सरपंच यांचेवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे केलेली आहे. भीमज्योती नवयुवक बहुउदेशिय मंडळ पोटेगाव हे रजि. असुन येथील बौध्द बांधवानी दिक्षाभुमी निर्माण करून सदर जागेवर गेल्या २० वर्षापासुन कार्यक्रम घेत आहेत. अश्यातच काही समाज कंटकांचे जळले व ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याच्यासाठी एवढे मोठे संविधान बहाल करुन त्यांना हक्य व अधिकार मिळवून दिला अश्याच लोकानी यांची जान न ठेवता एका जातीयवादी भावनेतून गावातील नालीमधील घाण कचरा डॉ. आंबेडकरांच्या नावाने असलेल्या दिक्षाभुमीच्या जागेवर जनू काही डंपिंग झोन तयार करीत आहेत की गावात दुर्गंधी पसरवित आहेत कारण दिक्षाभुमी गावातच आहे. डंपिग झोन असेल तर गावाच्या बाहेर १ किमी अंतरावर असतो. एकंदरीत असे की सदर दिक्षाभुमी च्या वरच्या बाजुला स्मशानभुमी आहे. वास्तविक ती अवैध असुन त्याचे ५ लाखाचे स्मशान भुमी व सिंमेट कांफ्रेटचा रस्ताचे बाधकाम अवैध आहे. सदर जागा हि वनविभागाची आहे. स्मशानभुमी अशी तलाटी साज्या कडे तशी नोंद ही नाही. आता तर वनविभागाने सदर जागेवर तारेचे कुंपणही केलेले आहे. सदर ठेकेदाराने केलेले अवैध बांधकाम याचीही चौकशी व्हावी तरच सत्य काय ते बाहेर निघेल. अर्धवट रस्यावर पुढे रस्ता करावा म्हणुन धान कचरा ग्रामपंचायतने चक्क दिक्षाभुमीच्या पाचफुट जागेवर आणून टाकला अवैध स्मशान भुमीचा रस्ताच तयार करावयाचा होता तर झाडापासुन सरळ रोड बनवायला पाहीजे होता यात बौद्ध बांधवाची काहीही हरकत नव्हती परंतु काही जातीयवादी लोकांनी घान चक्क दिक्षाभुमी जागेवर टाकून तिरपा रस्ता बनविन आहेत. त्यामुळे दिक्षाभूमीवरील टाकलेला केरकचरा मुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या गेलामुळे संबधिता विरोधात पो. स्टेशन पोटेगाव येथे रिपोर्ट दिलेली आहे. पोटेगांव सरपंच व ग्रामसेवकांनी घाण कचरा त्वरीत हटवावा अन्यता बौद्ध बांधव आंदोलन छेटल्याशिवाय राहणार नाही.. या प्रकरणात ठेकेदार व वनविभागाची चौकशी होणे गरजेचे आहे. कारण दिक्षाभुमीची जागा रेकार्डवर आहे परंतु स्मशानभुमी कोणत्याच रेकार्डवर नाही .