तकिया मारोती मंदिराच्या सभागृहात आयोजित भव्य रोगनिदान शिबिराचा समारोप झाला.

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

 पारशिवनी :- शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर व बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वानाडोंगरी नागपूर व भाजपा तालुका वैद्यकीय आघाडी व शहर आघाडी भारतीय जनता पार्टी व शहर महिला आघाडी भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक 20 जुन 2017 रोजी करण्यात आले होते. पारशिवनी पोलीस ठाण्यासमोर तकिया मारुती मंदिर देवस्थान सभामंडपात संपन्न झाला.

या शिबिरात मेडिसिन स्पेशालिस्ट नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. बाल रोग. ऑर्थोपेडिक्स, शस्त्रक्रिया, त्वचारोग, नाक, कान, घसा या आजारांची दंत चिकित्सक मार्फत मोफत तपासणी करण्यात आली.या शिबिर मध्ये पारशिवनी शहरा शिवाय आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांनी उपस्थित राहून मोफत निदान शिविर चा लाभ घेतला , या

शिबीर ला प्रामुख्याने नगर पंचायत च्या नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई कुभल कर यांची आपली उपस्थिती दर्शविली या शिविर ला यशस्वी करण्याकरिता डा. प्रमोद भड अध्यक्ष भाजपा तालुका वेधकीय आघाडी प्रमुख. श्री राजू भोयर अध्यक्ष भाजपा पारशिवनी शहर. माधुरी बाबनकुळे अध्यक्षा पारशिवनी महिला आघाडी व भाजप शहर प्रमुख . नगर पंचायत पाणी पुरवठा सभापती अनिता भड. नगर सेवक सागर सायरे. नगरसेवक राहुल नाखले. सुधाकर मेंघर, डॉ.राजेश ठाकरे, प्रकाश वाढे, अशोक कुथे, सौ छायाताई येरखेडे, रेखा दुनेदार, आशा वैध नगरसेविका, नरेंद्र बावनकुळे, दिवाकर भोयर, उमेश भोयर, फजित सहारे . परसराम राऊत ,केशवराव पोकळे, विजय भरणे, राजू रंधे, गो. प्रकाश कामडे, डॉ.स्वपलीन व डॉ. नरेश गिल आदींनी उपस्थित राहून हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.