चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी

भंडारा:- महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर कार्यकारिणी सदस्य म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी चे अध्यक्ष आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष खा. सुप्रिया सुळे आणि सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी येथील अध्यक्ष आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड केली आहे. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूरचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस सरकार्यवाहपदी आहेत. रविवार, १९ जून रोजी श्री खंडेराय प्रतिष्ठान, एसकेपी कॅम्पस बालेवाडी, पुणे येथे शिक्षण संस्था महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात सन २०२२ ते २०२७ या कार्यकाळासाठी अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अडचणींवर मात करून गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे कामकाज व्हावे, यासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले होते. या मंडळावर सर्वपक्षीय सदस्य आहेत. यामुळे भंडारा जिल्ह्याला राज्यस्तरावर प्रतिनिधित्व मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड झाली. यामुळे भंडारा जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ आणि शिक्षण क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com