अकोट प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( बार्टी ),पुणेच्या समतादुत प्रकल्पाच्या वतिने दहावी पास विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच अभिनंदन, तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश अण्णाजी गाढवे ( बार्टी ), पुणे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. राजेंद्र शिंदे ( राज्यशास्त्र विभाग प्रमुख ),कला,वाणिज्य,व विज्ञान महाविद्यालय,शंकरनगर ता.बिलोली, जि. नांदेड त्यांनी दहावी पास विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे याकरिता करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक सौ.कल्पना विनोद देशमुख( से.नि.) अॅग्लो हिंदी हायस्कुल, यवतमाळ त्यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.विजय धों. जितकर(विधी सेवा समिती सदस्य) शिवाजी ज्यु.कॉलेज आकोट, जि.अकोला त्यांनी सर्वप्रथम दहावी पास विद्याथ्र्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच विद्याथ्र्यानी आपले भविष्य घडविण्यासाठी नेहमीच निर्णयक्षमता, सकारात्मक दृष्ट्रीकोन, बौद्धीक क्षमतेचा नेहमीच वापर करायला हवा. ज्या विद्याथ्र्याना द्हावीच्या परीक्षेत अपयश आले असेल त्यांनी निराश होऊन अधिक जोमाने यश प्राप्त करावे.असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश गाढवे(सा.न्याय विभाग) बार्टी ,पुणे त्यांनी दहावी पास विद्याथ्र्याचे अभिनंदन करुन पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच समाजकल्याण व बार्टीच्या योजनेची माहिती दिली. उदा.स्कॉलरशिफ , स्वाधार योजना, वसतीगृह योजना, निवाशी शाळा, स्वंयसहाय्यता युवक गट,समान संधी केंद्र इ. माहिती दिली. कार्यक्रमातील मान्यवराचे आभार प्रकाश अण्णाजी गाढवे यांनी मानले.कु.श्रध्दा मानेकर,कु. जिया मानेकर,कु.शुभांगी खंडारे, कु.श्रुतुजा दिपे, कु.स्नेहा भगत, राहुल तायडे,कु.वैभवी डोळस, या विद्याथ्र्यानी मनोगत व्यक्त करुन डॉक्टर,इंजिनियर, वैज्ञानिक समाजसेवक होण्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com