रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
वर्धा-यवतमाळ
वर्धा-नितेश कराळे यांच्यात नेतृत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनांला सुरुवात करण्यात आली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशात च्या सार्वभौमत्वाचा व अखंडता छा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. चार वर्षाचा काळ हा सैनिकी सेवा देण्यासाठी अत्यंत कमी वेळचा आहे. त्या विद्यार्थ्यांना लष्कराचे नियम व कायदे कानून शिकवण्यासाठी त्याला. 2 ते 3 वर्ष लागते.त्यापैकी दीड वर्ष त्याला ट्रेनिंग मध्ये घालावे लागते. त्यामुळे अश्या अग्निपथ योजनेतून लागलेल्या भारतीय सैनिकांना घेऊन एखादी गुप्त मोहीमेत राबायची असल्यास अश्या गुप्त मोहीमा अयशस्वी होऊ शकते.
त्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते.
या योजनेमुळे चार वर्ष सेवा दिल्यानंतर असंख्य बेरोजगार युवकांची फळी निर्माण होऊन भारतामध्ये मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकते.जर या युवकांनी चार वर्षाचा काळ पूर्ण करून आल्यानंतर नोकरी मिळाली नाही.तर भारतामध्ये हिंसेचा डोंब उठू शकते. चार वर्षानंतर अग्निपथ योजनेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा काय ??याबाबत कोणतीही माहिती केंद्र सरकारने दिली नाही त्यामुळे ही योजना बोगस असल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे.या योजनेमुळे देशाची सुरक्षा यंत्रणा च मोदी सरकारने ध्याब्यावर बसली आहे असे प्रखर प्रहार या सत्ताधारी केंद्र सरकार त्यांनी केले.
संपूर्ण भारतात आर्मी ची तयारी करणाऱ्या विध्यार्थीमध्ये या योजनेमुळे असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. या योजनेचा निषेध म्हणून कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समितीच्या च्या वतीने जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले.
त्याबरोबर कराळे सरांनी विद्यार्थ्यांना असे आव्हान केले की देशातील कोणत्याही विद्यार्थ्याने शासनाच्या कोणत्याही मालमत्तेला हानी पोहोचू नये ही संपत्ती आपलीच आहे या संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेले आहे. त्यामुळे आपण संविधानिक मार्गाने हा लढा देऊ .जसा शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन करून शेतकऱ्या विरोधात ते अन्याय कायदे मागे घ्यायला लावले तसेच ही योजनासुद्धा केंद्र सरकारला मागे घेण्यास भाग पाडू. यांनी मागे नाही घेतली तर 2024 च्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.
*पाच लोकांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन*
नितेश कराळे,मोहित सहारे,गोविंद परिसे,
रोहन आदेवार, अतुल लेंडे,अमित महात्मे, प्रफुल गेडाम यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आली.
*पोलिसांचा तकडा बंदोबस्त*
अग्निपथ या योजनेचे देशभर आंदोलन सुरू असल्याने सर्वत्र हिंसक आंदोलन सुरू आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आंदोलन शांततेने करण्याचे आंदोलन आव्हान केले होते.
*मोठ्या प्रमाणात विद्यार्थी*
आंदोलनात जवळ्पास २०० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विदयार्थ्यांनी शांततेने आंदोलन केले.