चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा(साकोली):-
चांदोरी येथील वसंतराव नाईक
विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम क्रमांक सृष्टी विनायक कावळे हिचा असूनतिला ८६.६० टक्के गुण आहे., द्वितीय वैष्णवी दिनेश राय ८१.४० टक्के, तृतीय प्रांजल दिनेश राय ८०.८० टक्के, चतुर्थ मोहिनी प्रेमलाल शेंडे ८०.६० टक्के व पाचवा क्रमांक रसिका देवानंद रहांगडाले ८०.४० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले. मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत एकूण ४६ विद्यार्थ्यांपैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन, शाळेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.
संस्थाध्यक्षा विद्या कटकवार , सचिव शिल्पा नशिने, मार्गदर्शक
विशाल कटकवार, सदस्य मनोहरराव राखडे, मुख्याध्यापक प्रकाश मस्के, अरविंद बागडे,हितेश कावळे, विनायक कावळे ,हर्षल कावळे, प्रेमलाल शेंडे, देवानंद रहांगडाले, यशुका राँय,गायत्री शेंडे तुषार शेंडे, विनोद तिडके,, मनीषा काशीवार, दर्शन कटकवार, अविनाश मेश्राम, क्रीडा संघटक शाहिद कुरेशी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे..