पुणे जिल्हा प्रतिनिधी
शिवसेना ५६व्या वर्धापन दिनानिमित्त डाॅ.मनोहर डोळे मेडिकल फांऊडेशन,अथर्व नेत्रालय -सुपर स्पेशालिटी आय केअर सेंटर,पुणे आणि शिवसेना शाखा कोंढणपूर यांच्यातर्फे कोंढणपूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रमेशबाप्पू कोंडे यांचे हस्ते झाले. गावात असलेल्या साथीच्या रोगांची दखल घेऊन शिवसेना शाखेने धायरी येथील शरयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. किरण भालेराव यांच्यातर्फे गावातील थंडी तापाचे रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. एकूण १५० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विधानसभा प्रमुख नितीनदादा वाघ, तालुकाप्रमुख गणपतबुवा खाटपे ,मा पं समिती सदस्य पोपटतात्या चोरघे, सरपंच सौ.तृप्तीताई मुजुमले,मा.उपसरपंच मा.धनजंय मुजुमले, शिवापुरचेे उपसरपंच राजुदादा सट्टे, मा.मुकुंद आप्पा मुजुमले ,मा.रवि आण्णा मुजुमले मा. नामदेवदादा मुजुमले, जेष्ठ मार्गदर्शक सुरेशभाऊ गव्हाणे,पिराजीभाऊ मुजुमले, राजुबापु मुजुमले, बाळकृष्ण मुजुमले, शहाजीआण्णा अवसरे, निवृत्तीनाना मुजुमले, मा.तुळशीराम डिंबळे पाटील, विलासतात्या मुजुमले, नवनाथबाप्पु मुजुमले, प्रशांत कांबळे,आदिनाथ जरांडे, शेखर मुजुमले, अमोल मुजुमले,पांडुरंग गव्हाणे, बाळकृष्ण पवार, राजेंद्र मुजुमले तसेच कोंढणपूर ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते.
शिबीरास जेष्ठ नागरिक व माता-भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी माजी सरपंच विश्वनाथभाऊ मुजुमले, माजी चेअरमन सखारामतात्या मुजुमले, मार्गदर्शक रोहिदासआण्णा मुजुमले, जेष्ठ शिवसैनिक शांतारामआण्णा मुजुमले व राजुदादा मुजुमले यांचही मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
