वणी : परशुराम पोटे

वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भालर या गावातील २५ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सोमवार ला सकाळीस उघडकीस आली आहे.
हेमंत राजू खंगार (२५) असे मृतकाचे नाव आहे.
हेमंत हा भालर गावात वास्तव्यास होता. आज दि.२० जुन रोजी सोमवारी पहाटे गावाजवळील असलेल्या रॉकवेल कंपनी जवळ असलेल्या नाल्याजवळ एका झाडाला पहाटेच्या सुमारास लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
घटनेची वार्ता गावात पसरली यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना सूचित करण्यात आले. मृतक हेमंत हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. त्याने गळफास का घेतला? याचे कारण अद्याप अस्पष्ट असुन पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News