विवेक रामटेके
बल्लारपूर तालुका ग्रामीण

कोठारी – संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून जाहीर केलेला असून केंद्र सरकारने सुध्दा या दिवसाचे महत्त्व जाणून निरोगी आरोग्य पुर्ण जिवन शैली आत्मसात करून संपूर्ण भारतीयांचे आरोग्य सुदृढ व्हावे या उद्दात्त हेतुने संपूर्ण भारतात योग दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. योग दिनाचे औचित्य साधून स्थानिक युवकांनी प्रथमतःच पुढाकार घेऊन ” माझा गाव कोठारी ” या संकल्पनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, साद माणुसकीची फाऊंडेशन, भिम आर्मी (भारत एकता मिशन), सन्मित्र बहुउद्देशीय संस्था, रॉयल बहुउद्देशीय संस्था, छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था, पोलिस विभाग, कोठारी पत्रकार संघ, वनविभाग, आरोग्य विभाग, सामाजिक संघटना, विविध संस्था, महिला बचत गट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व युवकांच्या सहकार्याने एकत्रित बैठक घेऊन २१ जून रोज मंगळवार ला सकाळी ५.३०ते ७.०० वाजेपर्यंत जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या योगदिना निमित्ताने प्रशिक्षक म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या वेट लिप्टिंग सुवर्णपदकाच्या मानकरी, चंदिगड ” पंजाब” युनिव्हर्सिटी पॉवर लिप्टिंग पदक विजेत्या व योग अभ्यासक व मेडिटेशन बि.पी.एड कॉलेज विसापूर येथुन प्रशिक्षित प्रशिक्षिका कु. रुपाली दुर्योधन ह्या योग अभ्यास घेणार आहेत. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ” माझा गाव कोठारी ” नियोजित उपक्रमास मोठ्या संख्येने सहभागी होवून निरोगी आरोग्यासाठी होण्याचे आवाहन ” माझा गाव कोठारी ” संकल्पनेचे अध्यक्ष – नितीन रायपुरे, सचिव – अनिल विरुटकर, कार्याध्यक्ष – विवेक रामटेके, वासुदेव खाडे, सचिन रायपुरे, राज जुनघरे, संतोष लोनगाडगे, गिरीश लोहे, अभय बुटले, पियुष लोडल्लीवार, प्रमोद कातकर, संदिप मावलीकर, यांनी केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com