वणी : परशुराम पोटे
तालुक्यातील शिरगीरी येथिल शेतात विज पडून महीला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. २० जुन रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे.
शेख रज्जाक शेख मोहम्मद यांचे शेत शिरगीरी शिवारात आहे. आज सोमवारी दुपारी विजांच्या कडकडाटात पाउस सुरु झाला. दरम्यान त्यांची सून नसरीन अन्सार शेख (३०)ही शेतात काम करत असतांना बाजूला विज पडल्याने ती जखमी झाली. यावेळी तात्काळ तिला ग्रामीण
रुग्णालय वणी येथे भरती करण्यात आले होते. परंतु प्रकृती पाहता तिला लगेच चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयाला रवाना करण्यात आले आहे.