प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
भाजपाप्रणीत केंद्र सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन करोड नोकरीची निर्मिती करून देणार असे आश्वासन दिले होते. परंतु दोन करोड नोकऱ्या देणे तर दूरच बेरोजगारांना बेरोजगारीच्या खाईत ढगलण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणून देशातील युवकांना वेठबिगार बनवण्याचे काम ही सरकार करत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
लष्करासारख्या महत्त्वपूर्ण विभागात फक्त चार वर्षाची लष्कर सेवा देऊन चार वर्षानंतर पुन्हा बेरोजगार बनवण्याचे कटकारस्थान सरकार करीत आहे. त्यामुळे देशातील युवकांमध्ये प्रचंड आक्रोश तयार होत असून ठिकठिकाणी जाळपोळ व आंदोलने केल्या जात आहे. जाळपोळीमुळे या देशाचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून देशाची जागतिक पातळीवर प्रचंड बदनामी होत आहे. त्यामुळे सरकारने अग्निपथ ही फसवी योजना तात्काळ बंद करून जुन्याच पद्धतीने सैनिक भरती घेण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीद्वारा केंद्र सरकारकडे करण्यात आली. अग्निपथ ही योजना फसवी असून यामध्ये देशातील युवकांचे भविष्य धोक्यात येत असून लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करणाऱ्या युवकांसाठी अतिशय घातक आहे. योजना तात्काळ बंद करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी माध्यमाच्या माध्यमाने केंद्र सरकारला दिला दिला.