ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली जिल्हा हा जंगलव्याप्त असून येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीच्या मशागतीवर परिणाम होतो व परिणामी शेतीच्या उत्पन्नात घट होते. याकरिता यांत्रिकीकरणाने शेती करून तांत्रिक पद्धतीने शेती केल्यास त्याचा अधिक फायदा शेतकऱ्यांना व्हावा. यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोरचीच्या वतीने स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तालुक्यात दिनांक २५ जून ते १ जुलै २०२२ पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शेती विषयक विविध बाबींवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्व शेतकरी बांधवानी घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कु. विद्या मांडलिक यांनी केले आहे.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षाचे निमित्त साधून दिनांक २५ जून ते १ जुलै २०२२ पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण, महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण, खताची बचत, प्रगतीशील शेतकऱ्यांशी सुसंवाद, शेतीपूरक व्यवसाय, यंत्राच्या साह्याने मशागत केल्यास वेळेची बचत, तांत्रिक दृष्ट्या शेती केल्याने उत्पन्नात होणारी वाढ, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व किडींचे नियंत्रण, पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपूर्ण सप्ताहात होणाऱ्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्या शंकाचे निरासारण होऊन तांत्रिक पद्धतीने शेती करण्यास मदत होणार असल्याने या कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कु विद्या मांडलिक यांनी केले आहे.