नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
आसगाव-नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम ठेवत पवनी तालुक्यातील आसगांव जिल्हा परिषद हायस्कुल येथिल शाळेचा निकाल 93.52% टक्के लागला .
शाळेत शिस्त प्रामाणिकपणा जोपासली जाते गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन कौतुक आणि अभिनंदन मुख्याध्यापक माननीय श्री किशोर कुमार देशमुख यांनी केले . त्याप्रसंगी उपस्थित शाळेतील शिक्षक नामदेव लिचडे सर , आसाराम मेश्राम सर , गुणवंत ब्राह्मणकर ,भोपे भाऊ आणी पालक
त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रथम क्रमांक नरेश सिताराम पागोटे 94.80% ,
द्वितीय क्रमांक कुमारी प्रतिक्षा विनोद शहारे 93.% ,
तृतीय क्रमांक कुमारी डिंपल मुरलीधर कुलुरकर 92.80% ,आणी तृतीय कुमारी मृणाली श्रीराम भोपे 92.80% ,हिमांशी विकास डोये 92% , टिपा प्रभाकर सावरकर 91% टक्के.
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 140 मेरीट ( 90 टक्केच्या वर 6 विद्यार्थी तर प्राविण्य श्रेणीत 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 45 द्वितीय श्रेणीत 49 तर तृतीय श्रेणीत 10 विद्यार्थी असा प्रकारचा क्रम राखत निकाल जाहीर झाला आहे.