वणी : परशुराम पोटे

आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने दि.२१ जुन रोजी येथील बाजोरिया सभागृहात नि:शुल्क योगविज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मा. पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे,मा.जि.प.सदस्य विजय पिदुरकर, गजानन विधाते, प्रकाश नागतुरे, सौ.संध्याताई अवताडे, स्मीताताई नांदेकर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.
योगदिन कार्यक्रमा अंतर्गत घेतलेल्या निशुल्क योगविज्ञान शिबीर कार्यक्रमाचे सादरीकरण प्रा. महादेव खाडे यांनी केले. यात यावेळी ओंकार, प्रार्थना, शरीरसंचलन, विविध आसने, प्राणायाम, सुक्ष्म हालचाली, अँक्यूप्रेशर, संकल्प, शांतीपाठ, जयघोष घेण्यात आले.
त्यासोबतच नियमित योगा अंतर्गत विविध योगासने, प्राणायाम व ध्यान इत्यादी पासुन होणारे फायदे, आहार कसा असावा, विरुद्ध आहाराचे दुष्परिणाम, दैनंदिन जीवनशैली ईत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी योग साधकांनी सभागृह खचाखच भरले होते. वणी येथे २००९ पासून विविध ठीकाणी नियमितपणे योगवर्ग घेत असलेल्या योगशिक्षकांचा परिचय करूनदेण्यात आला.
या कार्यक्रमाला रामराव गोहोकार, प्रा. गजानन अघळते, डाँ. अरुण एकरे, मारोती ठेंगणे, श्री दहेकर, उमाकांत कुचनकर, बेलेकर सर, पवन ढवस, श्री राजूरकर ,वैद्य साहेब ,सौ. वर्षाताई खूसपूरे, विद्याताई जुनघरीई सह अनेक मान्यवरांनी लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगशिक्षक लक्ष्मण इद्दे, गुलाब निते, वसंतराव उपरे, राजकुमार पाचभाई, विजय ढाले, सुभाष इंगोले, सुरेश बागळते, सौ. विजयाताई दहेकर, मायाताई माटे, लताताई थेरे इत्यादी योगशिक्षकांनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com