वणी : परशुराम पोटे
तालुक्यातील मौजा नांदेपेरा येथील कुणाल नारायण मत्ते (25) या युवकाने स्वःताचे राहते घरी विषारी औषध प्राशन केले होते.
प्राथमिक उपचारासाठी त्याला वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले होते. परंतू प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपुर येथे सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. चार दिवसांपासून उपचार सुरू असतांना मंगळवारी दि. 21 जुन ला कुणाल ने आखरी श्वास घेतला. वैयक्तीक अंतर्गत कारणाने त्याने आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे. त्याचे पाठीमागे आई वडील असा आप्त परिवार आहे.