वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम ; येथून जवळच असलेल्या ग्रा. केकत उमरा येथील राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण संस्था व नेहरू युवा मंडळ केकतउमरा अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादुर व सदस्य आदी युवक मंडळी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी योग दिन साजरा केला. असून योगाचे महत्व पटवून दिले आहे.माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजादी का अमृत महोत्सवी योग दिन मोठ्या उत्साहात मध्ये संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जात असून वाशिम जिल्ह्यामध्ये देखील शासकीय तथा निमशासकीय कार्यालयाच्या वतीने हा योग दिन मोठ्या संख्येने साजरा करण्यात येत आहे. या अनुसाघाने युवा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी राष्ट्रीय युवा कोरे भारत सरकार नेहरू युवा केंद्र वाशिम व एन.एस.एस स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादुर मनालेकी मित्रांनो. योगा करण्यामुळे आपल्या शरीरा बरोबर आपले मनही निरोगी राहते. आणि डिप्रेशन. बी.पी. सुगरसारखे आजार आपल्या जवळही फिरकत नाही.
मित्रांनो शुशांतशिंह राजपूत सारखा सुप्रशिद्ध कलाकारही डिप्रेशनमुळे आत्महत्या करतो,अहो काय कमी होते. त्याला प्रशिद्धी, पैसा, सुद्रुढ शरीर सर्वकाही होते. त्याच्याजवळ फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची कमी होती. ते म्हणजे “सुद्रुढ मन” आणि हो तुम्हाला जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता एक तास योगा करायचाच. तर मित्रानो आज २१ जुन म्हणजेच ‘जागतिक योग दिन’ या दिवशी आपण सर्वानी शपथ घेऊया कि रोजचा एक तास आपल्या शरीरासाठी देणार रोज एक तास न चुकता योगा करणार.
आंतरराष्ट्रीय योग दिन थीम म्हणजे “मानवतेसाठी योग”. आपणास माहित आहे की संपूर्ण जग कोविड -१९ साथीच्या आजारातून जात आहे. आणि जवळजवळ प्रत्येक देशाने लॉकडाउन लादले होते.. लोक व्यायामासाठी किंवा योगासाठी बाहेर जाणे कठीण किंवा अशक्य झाले होते.आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 थीम लोकांना घरी प्रेरित राहण्यास आणि व्यायाम आणि योगाद्वारे निरोगी जीवनशैल अवलंबण्यास प्रेरित करते. व्यायामामुळे लोकांना आशावादी राहण्यास मदत होते. आणि योगासने बाहेर न जाता वेळ घालवण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी नवीन कल्पनांचा शोध घेण्यास मदत करते. अशा प्रकारे या योग दिनाचे ठिकाण म्हणजे आपले घर होते. आपण सहकार्य करत घरी राहून योग सहकार्यातून केले.. या सर्व बाबी सी सामना करत आपण कोरोना ला हरविले आहे.पण आजुन देखील कोरोना गेला नाही स्वतःची काळजी घेणे आणि आणि आरोग्य साठी योगा करणे हे अतिशय गरजेचे आहे… देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजच्या दिनी आजादि का अमृत महोत्सव अंतर्गत संपूर्ण देशामध्ये ८ वा आंतरराष्ट्रीय योग एक दिन आजच्या 21 जून या दिनी साजरा केला जात आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा मंडळाच्यावतीने योग दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्रविण पट्टेबहादुर, प्रदिप पट्टेबहादुर, सुरज सरकटे, संदिप कांबळे, अजय राजे, अशांत कोकाटे, विजय कुमार राऊत, संजय नेहुल, अल्ताफ चौधरी,नितीन मोरे, आदी जन उपस्थित होते..
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत