नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
पवनी-नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम ठेवत शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पवनी तालुक्यातील वैनगंगा विद्यालय पवनी येथिल शाळेचा निकाल 96.76 टक्के लागलेला असून शाळेतील शिस्त प्रामाणिकता आणि मेहनत विद्यार्थी कडून केली जाते .
त्यावेळी एका सर्व सामान्य कुटुंबांतील शेतकरी घराण्यातील जिदी आणि मेहनत घेऊन पूर्वेश विलास मांडवकर यांनी 94.% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर आई आणि वडील च्या चेहऱ्यावर एक प्रकारची हास्य फुलले होते. दोन वर्ष सतत कोरोना काळाच परिस्थिती असून लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथिल छोट्या गावातील विद्यार्थी असून इतर टॉपर न शाळेतील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने गुण प्राप्त केले आहे . पुढे त्याला आय आय टी ला जाण्याचे स्वप्न साकार करायचे आहे . असे पुवेश यांनी सांगितले
त्यामुळे त्याच्या यशाचे श्रेय वैनगंगा विद्यालयातील शिक्षक आणी आपल्या आई वडिलांना दिलेलं आहे.