प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

बाप म्हणजे वडिल,बाबा,दादाजी,बाबूजी,डाॅड,अशा अनेक शब्दांनी बोलल्या जात असलेल्या जन्म दात्यांचा आज दिवस..
आजचा हा जन्मदात्यांचा दिवस भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्वपूर्ण आहे.मात्र या दिवसाला बापांची मुलेमुली कशाप्रकारे मनात घेतात,हे त्यांच्या विनयशिलतेवर आणि विनंम्रपणावर अवलंबून असते.
बाप!,कठोर असते असे बरेचदा कानावर पडतय.कठोर आणि कटूता यात जमीन अस्मानाचा फरक आहे.कटूता म्हणजे वैरत्व निर्माण करणे,वैरत्वाने वागणे होय किंवा कायम न बोलणे होय,तद्वतच आजन्म वैरत्व करणे होय.कठोर म्हणजे काय तर मनात असलेले विचार,मनात असलेले कर्तव्य,मनात असलेल्या भुमिका,कळू देता कुटूंबातील सदस्यांच्या समस्यांना सदैव अग्रगण्य प्राधान्य देवून त्या समस्यांना कमी करणे होय,निकाली काढणे होय,तद्वतच सर्वांचे भविष्य हितचिंतने होय.व इतर कौटुंबिक परिवारातील,मित्र परिवारातील सदस्यांना कुशल कर्मान्वये मैत्रीचा ओलावा देणे होय,प्रसंगानुरूप सहकार्य करणे होय.

मात्र,बाप कठोर असते म्हणजे नेमके काय?
“तर,परिवारातील सदस्यांना विपरीत परिस्थितीची माहिती होवू न देता कठोरातले कठोर श्रम घेवून,त्यांच्या अळचणींना दूर सारणारा बाप!.,”अपमानाच्या परिभाषेला उद्याच्या सन्मात बघून परिवारातील सदस्यांचे व मुलांचे दु:ख झेलणारा बाप!.,”मनातील दुःखाना व वेदनांना कायम बंदिस्त करीत मुलामुलींचा भविष्यासाठी सातत्याने धडपडणारा बाप!.,”स्वतःच्या सुखापेक्षा मुलामुलींचे सुख बघणारा बाप!.,”दु:खाला आनंद व समाधान मानून मुलामुलींच्या संरक्षणासाठी,हितासाठी,स्वतःला नेहमी कोंडणारा बाप!., स्वतः पेक्षा मुलामुलींना सरस करण्यासाठी भर उन्हात घाम गाळणारा बाप!.,”स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना महत्व न देता मुलामुलींच्या इच्छा-आकांक्षाचे बारकाईने महत्त्व हेरणारा बाप!.,”स्वतःच्या तहान-भूकेला, विसरून मुलामुलींना उपवासाची न ठेवता त्यांना नकळत मायेची उब देणारा बाप!.,”स्वतःला दु:खातंर्गत व वेदनातंर्गत सांभाळून मुलामुलींचे संगोपन करणारा बाप!.,”मुलामुलींनी अपमान केला तरी न बोलता ममतेची करुणा भरभरून देणारा बाप!.,सर्व परिस्थितीत कुटुंबाचे ओझे सदोदित वाहणारा बाप!.,मुलेमुली बोलले नाही तरी त्यांच्या सोबत हृदयपुर्वक आंत्तर मनाद्वारे बोलणारा बाप!.,”न रडता सर्व बोलणारा बाप!.,”आणि….कुशल कर्मान्वये मुलामुलींना जन्म देणारे बाप-आई!.,
बाप!,या शब्दाला अनेक प्रकारच्या परिभाषा मध्ये अलंकारिक करता येतय‌.बाप म्हणजे मुलामुलींचे धैर्य,हिम्मत,मनोबल,आत्मविश्वास,उज्वल भविष्य,यशस्वी जिवन,आधार,व संकट काळातील भारवाहक!…
म्हणूनच,”बाप,या शब्दाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्या,”बापाला,कोणत्या भुमिकाने व कर्तव्याने मुलेमुली समजून घेतात हे त्यांच्या आकलन शक्तीवर अवलंबून असते…तृत एवढेच!

👇👇
(अयोग्य वैचारिक द्वंदाला अनुसरून हे संपादकीय नाही…)

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News