प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
दिक्षा ललिता
कार्यकारी संपादक
मिटर तुटवडा अंतर्गत घरगुती विज जोडणी संबंधाने होणारी महिनोगिनती दिरंगाई नवीन विज ग्राहकांना नाहक मनस्ताप देणारी व नाहक परेशान करणारी ठरत असल्यामुळे विज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सातत्याने चव्हाट्यावर येतो आहे.मात्र अशा अनागोंदी कारभाराकडे विज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याचे मिटर पुरवठा दिरंगाई वरून लक्षात येते आहे.
नवीन विज जोडणी करण्यासंबंधाने मागील ३ महिन्यांपासून ग्राहकांनी डिमांड भरले आहे.मात्र ३ महिन्यातंर्गत मिटरचा तुटवडा आहे,या कारणांनी नवीन विज ग्राहकांना घरगुती विज जोडणी करण्यात आली नाही.
डिमांड भरणारे नवीन घरगुती विज ग्राहक मिटरच्या प्रतिक्षेत असून,त्यांना मिटरचा पुरवठा विज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी केव्हा करणार?हा यक्ष प्रश्न संभ्रमामध्ये व बुचकळ्यात टाकणारा आहे.
वास्तविकता नवीन घरगुती विज ग्राहकांना तात्काळ विज जोडणी करण्यासंबंधाने विज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमी कर्तव्यदक्ष व कर्तव्यतत्पर असने आवश्यक आहे.मात्र विज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विदर्भातील हजारो नवीन विज ग्राहकांच्या त्रासाकडे,परेशानीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.यावरुन स्पष्ट लक्षात येते की त्यांना ग्रामीण भागातील नवीन विज ग्राहकांना मानसिक त्रास द्यायचा आहे.
घरगुती विज जोडणी करण्यासंबंधाने विज वितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी केली तर नवीन विज ग्राहक हे कंपनीच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर समाधानी असणार आहेत.
मिटर तुटवडा अंतर्गत घरगुती विज जोडणी संबंधाने,नेहमी होणाऱ्या दिरंगाईकडे ऊर्जामंत्री नामदार डाॅ.नितीन राऊत यांनी स्वतः जातीने लक्ष द्यावे,असी आर्त हाक विदर्भातील नागरिकांची आहे.