प्रा.भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाद्वारे फेब्रुवारी 2024 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती.त्या परीक्षेचा रिझल्ट दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल घोषित करण्यात आला आहे.
धानोरा तालुक्यामध्ये एकूण 15 उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये एकूण 687 विद्यार्थी यांनी परीक्षेसाठी अर्ज केलेले होते, त्यापैकी 629 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
यात महाविद्यालय चा निकाल पुढील प्रमाणे,यामध्ये जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज धानोरा रिझल्ट 89.47% ,, लीसीट ज्युनिअर कॉलेज रांगी 78.94%,, महेश सावकार पोरेड्डीवार चातगाव 80.95%,, शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा रांगी 94.28%,, जी.सी. पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा 85.18%,, रामचंद्र दखणे कनिष्ठ कॉलेज मुरूम गाव 95 टक्के,, जिजामाता उच्च माध्यमिक ईरुपटोला 96.55%,, शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा 100%,, शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा पेंढरी 100% ,, प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालय धानोरा 90.47% ,, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय कारवाफा 100%,, शासकीय पोस्ट बेसिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा सोडे 97% ,, मातृभूमी कला कनिष्ठ महाविद्यालय पेंढरी 81.81%,, भगवंतराव अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा गट्टा 93.54% ,, जिल्हा परिषद जुनिअर कॉलेज मोहली 91.02%,, अशा पध्दतीने लागला असून धानोरा तालुक्यात तीन महाविद्यालयचा निकाल 100% लागला आहे.