संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
सामाजिक संघटन मजबूत करतांना दुरगामी असी शिध्दांतवादी व योग्य दिशेने वाटचाल करणारी वैचारिक क्षमता,” नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे असेल तर ,या देशातील नागरिकांत स्वाभिमान जागरूक होतो व तोच स्वाभिमान स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी सातत्याने संघर्ष करण्यास गतिमान होतो हे आपण भारत देशाच्या सामाजिक व राजकीय पटलावर प्रत्यक्ष बघितले आहे.
गतिमान नेतृत्व हे प्रत्येक समस्यांना भेदणारे असते. तद्वतच कुठल्याही परिस्थितीला हाताळण्याची क्षमता त्या नेतृत्वात असते,याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणजे सन १९६८ ते सन २००६ च्या कालखंडातील सामाजिक व राजकिय घडामोडी अंतर्गत उत्तम कार्य आणि उत्तम कर्तव्य होय.
त्या नेतृत्वाची आठवण आली की आजचे राजकीय व सामाजिक चित्र बघताना काहीसे अजब वाटते आणि शरमेने मन खिन्न होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित अनेक राजकीय व सामाजिक संघटना पुढे आल्यात.परंतू स्व समाजाच्या पलिकडे त्यांना आपले स्थान निर्माण करता आले नाही हे वास्तव भयंकर कष्टदायक असेच आहे.
सामाजिक व राजकीय संघटनातंर्गत आवश्यकता वेळी सर्व प्रकारचे हादरे देणारी क्षमता नेतृत्वात असणे गरजेचे आहे आणि त्या नेतृत्वाजवळ त्याच पध्दतीची पदाधिकाऱ्यांची,कार्यकर्त्यांची फळी असने सुध्दा आवश्यक आहे.
योग्य वेळी उत्तम कार्य करण्याची क्षमता ज्या नेतृत्वात असते,ते नेतृत्व कधीच कोलांट्या मारणारे कर्तव्य पार पाडत नाही.तर असे नेतृत्व वेळेचा सदुपयोग सर्व समाज घटकातील नागरिकांच्या हितासाठी सदोदित करीत असते या सत्याला नाकारता येत नाही.
महत्वपूर्ण मुद्दा असा की,जगविख्यात प्रकांड पंडित तथा सर्व भारतीय नागरिकांचे तारणहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर,”कांशीराम,नावाचे योग्य असे वैचारिक वादळ व उत्तम असा वैचारिक झंझावात भारत देशातील नागरिकांनी बघितला व अनुभवला..
मान्यवर कांशीराम यांनी या देशातील जातीव्यवस्थेचे सर्व बिंदू उलगडत,”सर्व जातीच्या नागरिकांवर होणारा एकसमान अन्याय व त्या सर्वांचे होणारे एकसमान शोषण,याचे बारकावे अभ्यासा अंती तपासले आणि त्याच अन्यायावर व शोषणावर आधारित अख्खी सामाजिक आणि राजकीय चळवळ उभी केली.याचबरोबर त्या दोन्ही चळवळी यशस्वी करून दाखविल्यात.
त्यांनी राजकीय व सामाजिक स्तरावरील अन्यायाची व शोषणाची उकल करताना,भारत देशातंर्गत बहुजन समाजातील नागरिकांची सर्व बाजूंनी केलेल्या कोंडीचे तटबंद तोडण्याचे ठरविले.
आणि म्हणूनच त्यांनी समाजमनावर प्रभाव पाडणारा वास्तव्यवादी अतिशय संवेदनशील व अत्यंत महत्त्वपूर्ण असे स्लोगन दिलेत… त्यापैकी केवळ दोन स्लोगनांचा आपल्या माहिती साठी उपयोग करतो आहे.
१)..”जितनी जिसकी संख्या भारी,”उतनी उसकी भागिदारी…
२) “वोट हमारा राज तुम्हारा,नहीं चलेगा नहीं चलेगा….
मान्यवर कांशीरामजी,वरील नारे देऊन थांबले नाहीत तर या दोन्ही स्लोगन अंतर्गत अख्या भारत देशातील समाजमनाला संवेदनशील,सतर्क व जागरूक करणारे महान कार्य केले व बहुजन समाजातील नागरिकांवर कोण कशा प्रकारे अन्याय करतात व त्यांचे शोषण कशाप्रकारे करतात याचा पुराव्यानिशी घटनाक्रम जनतेसमोर आणला होता.
याचबरोबर मान्यवर कांशीराम म्हणजे न थांबणारे व न थकणारे गतिमान व चारित्र्यसंपन्न नेतृत्व होते.ते बोलून मोकळे होत नव्हते तर प्रत्येक बोललेल्या शब्दावर अमल करीत होते.याचबरोबर ८५ टक्के ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक,मुस्लिम,मागासवर्गीय, बहुजन समाजातील नागरिकांच्या हितासाठी,सुरक्षेसाठी,सन्मानासाठी,अस्मितेसाठी,स्वाभिमानासाठी,स्वावलंबनासाठी,व लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तेतील सहभागासाठी सातत्याने कृती व कार्य करीत होते.अहोरात्र धडपडत होते,संघर्ष करीत होते.
भाजपा -काॅग्रेस पक्षाला वगळून,”बहुजन समाजातील नागरिकांनी स्वबळावर केंद्र सत्ता व राज्य सत्ता हस्तगत केल्याशिवाय त्यांच्या सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करता येत नाही हे त्यांनी ओळखले होते.
ते नेहमी सांगायचे काॅंग्रेस व भाजपा दोन्ही पक्ष देशातील बहुजन समाजासाठी विषारी नागाच्या विषाप्रमाणे आहेत.या दोन्ही पक्षांतील पक्ष प्रमुख बोलतात एक व करतात दुसरेच.ते कधीच या देशातंर्गत बहुजन समाजातील नागरिकांना सत्तेत समान वाटा देणार नाहीत व प्रशासकीय यंत्रणेत लोकसंख्येच्या आधारावर सहभागी करून घेणार नाहीत.अर्थात बहुजन समाजातील नागरिकांसाठी दोन्ही पक्ष घातक आहेत,हे परिस्थितीजन्य पुराव्यावरून ते स्पष्ट करायचे.
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष मान्यवर कांशीरामजी यांनी सांगितल्याप्रमाणेच भारत देशात आजही घडत आहे.बहुजन समाजातील नागरिकांना ना सत्तेत समान वाटा मिळत आहे व ना प्रशासकीय यंत्रणेत समान सहभाग मिळत आहे..
आजच्या स्थितीत सर्व बाजूंनी नियंत्रित व्यवस्था करण्यात आली आहे.यामुळे बहुजन समाजातील नागरिकांना बोंबलत राहण्यापलिकडे दुसरे काम सत्ताधाऱ्यांनी व भांडवलधाऱ्यांनी ठेवले नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही.
म्हणूनच मान्यवर कांशीरामजी यांनी राज्य सत्तेचे सांगितलेले सुत्र,त्यांच्या हयातीतच बहुजन समाज प्रत्यक्ष अनुभवत होता,पहात होता.कमी आमदारात व कमी खासदारात सत्तेला कसे हस्तगत करता येते व सत्तातंर्गत लोक हिताची सर्व कामे कशी केली जातात हे चित्र बसपाने वास्तव्यावर रेखाटले.
बहुजन समाज पार्टी या देशाची नंबर एकची पार्टी बनेल व वर्षानुवर्षे सत्ताधारी पार्टी राहील,तेव्हा आमचे काही चालणार नाही व आमच्या सत्तेचे सर्व पितळ उघडे पडले हे या देशातील बहुजन समाज विरोधकांनी ओळखले होते.
म्हणूनच सन १९८४ ला स्वर्गीय इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना,”पुढे चालून,”ईव्हीएम मशीन द्वारे भारतात निवडणूका करण्यात याव्यात यासाठी लोकसभेत व राज्यसभेत ठराव संमत करण्यात आला होता.
तात्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी लोकसभेत ईव्हीएम मशीन बाबत ठराव मांडला,सुचक माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी होते तर अनुमोदक माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी होते.
बघायला तिघे तिन पक्षाचे वाटत असले तरी,आंत्तर व बाह्य कार्यातून एकाच विचारसरणीचे असल्याने,”भारत देशात ईव्हीएम मशीन आणून त्या ईव्हीएम मशीन द्वारे निवडणूका घेण्याच्या उदेशात ते यशस्वी ठरले.
याला म्हणतात बहुजन समाज विरोधातील दीर्घकालीन कुटनिती..
“मारायचे पण भनक लागू द्यायची नाही..”वंचित ठेवायचे पण कळू द्यायचे नाही…”शोषण करायचे पण बोंबलू द्यायचे नाही..”अन्याय – अत्याचार करायचा पण आवाज बाहेर पडू द्यायचा नाही… अशा प्रकारे नियोजनबध्द पध्दतीने सुरू असलेल्या राजकीय वळणाचा व राजकीय कारकीर्दीचा प्रकार हा भोळ्याभाबड्या मतदारांच्या डोक्याच्या बाहेरचा आहे.
ईव्हीएम मशीन द्वारा घोटाळे करून निवडणुका जिंकता येतात हे प्रमाण सर्वोच्च न्यायालयात सन २०१३ ला व सन २०१७ ला शिध्द झाले.यामुळे ईव्हीएम मशीने बहुजन समाज पार्टीला कमजोर केले आहे हे नाकारून चालणार नाही.
मान्यवर कांशीराम यांनी बहुजन समाजातील नागरिकांच्या हितासाठी प्रस्थापित पक्षांना व त्यांच्या सत्तेला वारंवार हादरे दिलेत,त्यांना अस्थिर व कमजोर केले,त्यांची राजकीय शक्ती कमी केली हे प्रखर सत्य आहे.
आणि ते नेहमी सांगायचे अस्थिर व कमजोर सरकार असल्याशिवाय बहुजन समाजातील नागरिकांच्या हिताचे धोरणे अमलात आणता येत नाही व राबविता येत नाही.
दुसरे असे की ज्या काॅंग्रेसच्या केंद्र सरकारने विरोधी पक्षांना सोबत घेऊन ईव्हीएम मशीन बाबत लोकसभेत ठराव संमत केला त्या काॅंग्रेसच्या व इतर पक्षांच्या नेत्यांना ईव्हीएम मशीन चा खेळ माहिती नाही असे होत नाही.
सन २०२४ ला काॅंग्रेस केंद्रीय सत्ताधारी असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
मात्र पुढे चालून,” बहुजन समाज पार्टीचा राष्ट्रीय दर्जा, ईव्हीएम मशीनच्या खेळखंडोबात कायम राहीला नाही तर या देशातील ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याक मुस्लिम- विमुक्त भटक्या जाती जमाती व मागासवर्गीय समाज घटकातील नागरिकांचा सरळ पराभव असेल आणि हा पराभव केवळ मनुवादी विचारसरणीच्याच लोकांनाच कळलेला असेल.
बहुजन समाज पार्टीचा पराभव म्हणजे या देशातील तमाम बहुजन समाजातील नागरिकांचा सरळ सरळ पराभव आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
म्हणून देशातील बहुजन समाजातील नागरिकांनी वेळीच सावध व जागरूक व्हावे आणि ईव्हीएम मशीनला निवडणूक प्रक्रिया मधून कायमचे हद्दपार करने अनिवार्य आहे…
तद्वतच क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर खरे राजकारण व खरे समाजकारण मान्यवर कांशीराम यांनीच देशातील तमाम नागरिकांना सांगितले हे सत्य सर्वश्रुत आहे.