अलंकापुरीत महावीर जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

आळंदी :- जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांची जन्मकल्याणक उत्सव रविवारी अलंकापुरी शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आली.

          महावीर जयंतीनिमित्त सकल जैन बांधवांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील जैन मंदिरापासून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली होती. अहिंसा परमोधर्म की जय, वंदे विरम ,भगवान महावीर स्वामी की जय’, अशा आवेशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

            यावेळी, प्रशांतऋषीजी, आळंदी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सतीष चोरडिया, माजी नगराध्यक्ष शारदा वडगावकर, अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर वीर, डॉ.मनोज राका, मदनलाल बोरुंदिया, रमेश नवलाखा, सचिन बोरुंदिया, मोहनलाल चोपडा, राजेंद्र धोका, राजेश लोढा, सागर बागमर, दिलीप नहार, श्याम कोलन तसेच सकल जैन बांधव, महिला या शोभायात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.