
राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
२० मार्च २०२५ रोजी, विधानसभेत ६७-आरमोरी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्याबाबत आमदार रामदाजी मसराम यांनी सरकारचे लक्ष वेधले.
त्यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांवर चर्चा केली आणि सरकारकडून त्वरित पावले उचलण्याची मागणी केली.
आमदार रामदास मसराम यांनी विशेषतः आरमोरीतील पायाभूत सुविधा,संबंधित समस्यांवर भर दिला.त्यांनी सरकारकडून या क्षेत्रांमध्ये अधिक निधी आणि संसाधने उपलब्ध करून देण्याची विनंती केली.