
“दै.लोकमत, दै.सकाळ, दै.भास्कर (दिव्य मराठी), दै.पुण्य नगरी, दै.पुढारी, दै.नवाकाळ, दै.महाराष्ट्र टाइम्स, दै.लोकपत्र,इत्यादी प्रस्थापित आणि पांढरपेशा वृत्तपत्रांची पत्रकारीता (अपवाद केवळ लोकसत्ता) आणि विविध टी.व्ही. चॅनेल्स म्हणजे पत्रकारीतेच्या व्याख्येनुसार केवळ……..”
सरकारच्या दहशतीमुळे नपूंसक, षंढ आणि नेभळट झाली आहेत…….!
म्हणून आज 2025 मधला भारत देश
केवळ आणि केवळ…….
यू ट्यूब चॅनल, व्हाट्सअप, फेसबुक, गुगल, इन्स्टाग्राम, इत्यादी प्रसार माध्यमावरच तरलेला आहे….
कारण………
लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गदर्शक तत्वानुसार प्रसारमाध्यमाची अर्थात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची निर्मिती ही संसद / विधानमंडळ, सरकार (केंद्र आणि राज्ये), न्यायपालिका (सर्वच न्यायालये आणि प्रशासकीय न्यायाधीकरणे ) या सर्वांची घटनात्मक आणि नैतिक कर्तव्ये व्यवस्थित पार पाडून घेण्यासाठी निर्माण झालेली असते.
जर वरील संविधानिक घटकसंस्था निसर्गनियमावर आधारित असलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांची अविष्कारिता करण्यात 100% अपयशी ठरत असतील. तर त्यांना त्यांच्या त्या कर्तव्याची आठवण करुन देऊन तसे वर्तन करायला भाग पाडण्याचे नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य हे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे असते.
आणि जर वरील संविधानिक संस्था तसे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरत असतील, तर जनतेत जाऊन तशी जागृती करण्याचे नैतिक कर्तव्य हे सुद्धा याच मिडीयाचे आहे.
जेंव्हा संविधानिक घटक पक्ष, यांच्या हो ला हो मिळवत पत्रकारिता त्यांच्याच गोद मध्ये जाऊन विसावत असेल. भ्रष्ट सनदी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यापूरतीच आपली पत्रकारिता वापरत असतील तर तिलाच……….
“गोदी मीडिया” असे म्हणतात. या गोदी मीडियामुळेच आमचा 2025 मध्ये देश लोकशाहीविरहित झालेला आहे…..!
जनता बिचारी मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या शोषित आणि पीडिताची मालकीण होऊन बसली आहे. ना तीला वाली, ना ही तीचा उद्धारकर्ता……..
परंतू ,अशाही परिस्थितीत सुद्धा इतर सामाजिक प्रसारमाध्यमेच लोकशाही आणि संविधानाला तारण्यासाठी सज्ज आहेत. म्हणूनच आज माझ्यासारखे असंख्य समाजबांधव लिहून, बोलून व्यक्त होत आहेत आणि समाज जागृती कर्तव्यातून करत आहेत…..
शेवटी, जनतेने व्यक्त होण्यासाठी कोणतेतरी माध्यम आवश्यक आहेच ते इथे मिळते. म्हणून बुद्धीजीवी वर्गाने प्रस्थापित आणि गोदी मीडियात लिहिण्याचा आणि बोलण्याचा अट्टाहास न धरता जिथे शक्य आहे तिथे बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे……….
उलट आपापल्या घरी जी वर्तमानपत्रे टाकली जातात ती पत्रकारिताविहीन, हृदय नसलेली बातमीपत्रे अर्थात जाहिरातपत्रे बंद करुन टाकावीत. उगीचच गोदी मिडीयाला गर्भश्रीमंत होण्यासाठी आणि देशात गरीब श्रीमंतीची दरी अर्थात आर्थिक विषमता निर्माण होण्यास आपण का निमित्त ठरावं…..?
जेंव्हा हा पत्रकारितेचा चौथा अदृश्य आधारस्तंभ ढासळत चाललेला असतांना आमची लोकशाही, संविधान ICU तून शेवटची घटका मोजत असतांना……….
आम्ही केवळ बघ्याचीच भूमिका घेणार का……?
या दिवसाच्या उगवण्याची आम्ही वाट पाहत होतो का…..?
अशाच देशाच्या निर्मितीसाठी आमच्या स्वातंत्र्यविरांनी प्राणाची बाजी लावली का…..?
यासाठीच भारताच्या संविधानाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करुन उद्देशीकेतून “आम्ही भारताचे लोक…… आणि स्वताप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करण्याचे आव्हान केले होते का…….?
या एवं च्या गर्भातून केंद्र व राज्य सरकाराची निर्मिती होण्यासाठीच आम्ही वाट पाहत होतो का…….?
एक धूर्त आणि खोटारडा प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तसेच एका तडीपारच्या हातात गृहमंत्रालय देण्यासाठीच वाट पाहत होतो का……..?
असेच असेल तर मी ( अनंत भवरे ) या देशाचा नागरिक म्हणून कसा सिद्ध होऊ शकेल……?
मी या देशाचा नागरिक आहे……..
मी या देशाचा मालक आहे…….
माझ्यासाठीच हे संविधान, लोकशाही आणि व्यवस्था निर्माण झाली आहे……..
व्यवस्था माझ्यासाठी आहे. व्यवस्थेसाठी मी नाही…..
ही भावना माझ्यात जागृत झाली आहे……
तुमच्यात……….?
तुमच्यात सुद्धा जागृत झालीच पाहिजे……
कारण…….
ही प्रस्थापित इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया……..
“नपूंसक, नेभळट आणि षंढ होऊन सरकारच्या गोदमध्ये विसावली म्हणून…………!!!!!”