तालूक्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ३७५ प्रकरणे मंजुर…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

       कुरखेडा येथे तहसीलदार ओमकार पवार IAS यांचा मार्गदर्शनात तालुक्यात डिसेंबर 2023 मधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संभाव्य लाभार्थी विशेष शोध मोहिम राबविण्यात आली होती. त्यानुसार तहसिल कार्यालय, कुरखेडा येथे तहसीलदार ओमकार पवार यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्राप्त झालेल्या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत एकूण 383 प्रकरणात, 375 मंजुर, 08 नामंजुर करण्यात आले.

              त्यापैकी, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत एकुण 100 प्रकरणात 98 प्रकरण मंजुर व 02 प्रकरणे नामंजुर तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत एकूण 110 प्रकरणात 105 मंजुर 05 नामंजुर तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत एकूण 107 प्रकरणात 106 मंजुर 01 नामंजुर तसेच इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकूण 66 प्रकरणात 66 मंजुर ची कार्यवाही करण्यात आली.

            बैठकीत समिती शासकीय अध्यक्ष तहसीलदार ओमकार पवार, गट विकास अधिकारी धिरज पाटील, मूख्याधिकारी पंकज गावंडे, शासकीय सदस्य सचिव नायब तहसीलदार सत्यनारायण अनमदवार ,अव्वल कारकून अरुण गेडाम, अव्वल कारकून जगदेव नारदेलवार, महसूल साहायक उमाकांत चतुर ,आय टी असिस्टंट प्रफुल सुरनकर उपस्थित होते.स्थानिक महसूल प्रशासन जास्तीतजास्त जन सामान्याणा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे.