व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम व्यक्ती व समाज यांच्यावर सारखेच अनिष्ट होतात.

 

          “समाजाच्या अस्तित्वासाठी समाजबंधने जरी आवश्यक असली,तरी व्यक्तीच्या परिपोषाला अशी बंधने बाधक होतात. 

        जोपर्यंत समाजाचे मत आणि व्यक्तीचे मत यात एकतानता असते.तोपर्यंत लढा उत्पन्न होत नाही.परंतु जेव्हा समाजाच्या मतांत आणि व्यक्तीच्या मतात भिन्नता दिसून येते तेव्हा ओढाताण सुरू होते, आणि व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम उभयंतावर सारखेच अनिष्ट होतात.

          त्यातल्या त्यात सामाजिक बंधनाने व्यक्तिचा कोंडमारा झाला म्हणजे ज्या गोष्टी मनापासून कराव्याशा वाटतात,परंतु त्या समाज उघडपणे करू देत नाही,त्याच गोष्टी मनुष्य छपवून करावयास लागतो. 

          अशा प्रकारची सवय माणसास एकदा जडली म्हणजे तो सहजच दांभिक वृत्तीचा, दुहेरी वर्तनाचा, असत्य बोलणारा, अप्रामाणिक मनुष्य बनतो.”!!!

     – डॉ. बाबासाहेब आंबेडकर..

 (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१९,पान नं. १९९.)

          दि.१५ जुलै १९२७ रोजी “बहिष्कृत भारत “मध्ये प्रकाशित झालेला बाबासाहेबांचा लेख.

                    संकलन

         आयु.प्रशांत चव्हाण सर.