समाजसेवक क्रांतीवीर मानकर यांच्या नेतृत्वात,”ईव्हीएम मशीन,विरोधात अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. — हजारो कार्यकर्त्यांसह,”ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव,संबंधातील मुद्दे केले स्पष्ट..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादीका 

          ईव्हीएम मशीन म्हणजे आधुनिक काळातील मनुस्मृती आहे‌.ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुका विश्वासार्ह नाही.या मशीनच्या माध्यमातून घोटाळे करून मनुवादी विचारसरणीचे लोक नेहमी निवडणूक जिंकतात व या देशातील बहुजन समाजाला गुलाम बनविण्यासाठी देशातील सर्व यंत्रणा कामाला लावतात.

        यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिका द्वारा व्हाव्यात यासाठी समाजसेवक क्रांतीवीर मानकर यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

        ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका या लोकशाहीला व या देशातील नागरिकांसाठी घातक व मारक असल्याचे निदर्शनास आले असून,या निवडणुकांच्या माध्यमातून बहुजन समाजातील नागरिकांवर केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्याचे सरकार आपल्या धोरणाला अनुसरून वेगवेगळ्या पध्दतीने अत्याचार व अन्याय करतो आहे.

         हा अन्याय व अत्याचार अमान्य आहे.म्हणूनच यापुढे होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणूका या बॅयलट पेपरवर घेण्यात याव्यात या आशयाचे निवेदन समाजसेवक क्रांतीवीर मानकर व त्यांच्या हजारो सहकार्यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना काल दिले.

       आणि त्यांच्याच माध्यमातून सदर निवेदन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त नवी दिल्ली, प्रधानमंत्री व गृहमंत्री भारत सरकार यांना पाठविण्यात आले.