रोटरी क्लब चिमूरच्या वतीने मासिक पाळी समस्या विषयी व्याख्यान संपन्न…

    रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

रोटरी क्लब चिमूरच्या वतीने आज दि. 21 फेब्रुवारी 2025 ला अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची निवासी शाळा चिमूर येथे शालेय मुलींना मासिक पाळीच्या समस्या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

        यावेळी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील स्त्री रोग चिकित्सक डॉ.अश्विनी पिसे यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान स्वच्छ्ता राखणे तसेच योग्य व्यायाम व आहार सेवन करणे खूप जास्त आवश्यक आहे इत्यादी आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन केले.

       सोबतच डॉ.जयश्री वाघमारे आहारतज्ञ यांनी विविध खाद्पदार्थ यामध्ये जीवनसत्वे,प्रथिने, कॅल्शियम , लोहघटक यांचा समावेश कशा प्रकारे करता येईल आणि सर्व प्रकारचा हिरवा भाजीपाला व प्रत्येक ऋतूमध्ये मिळणारी ताजी फळे यांचा आहारामध्ये समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला.

        यावेळी रोटरी क्लब चिमूरचे अध्यक्ष विशाल गंपावार,सचिव कैलास धानोरे, प्रकल्प प्रमुख डॉ.महेश खानेकर, सुभाष केमये, संगमवार सर, राकेश बघेल, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता खोब्रागडे मॅडम, शिक्षकगण आणि विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.