दुर्मिळ शिवकालीन शस्त्राचे भव्य प्रदर्शन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे विचारांची शिवजयंती अंतर्गत भव्य दुर्मिळ शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन शिवशाही प्रतिष्ठान चौक,आझादनगर,कोथरूड येथे भरवण्यात आले होते.

        २५० पेक्षा जास्त ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय बघण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि आपल्या कुटुंबासह हे दुर्मिळ ऐतीहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे प्रत्यक्षात अनुभवले.

       छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी शिवशाही प्रतिष्ठान तर्फे प्रबोधन वाद्यपथक ठेवण्यात आले होते. 

        यावेळी कै.रामभाऊ मोकाटे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.शिवशाही प्रतिष्ठान कार्यक्रमाचे अध्यक्ष निहाल शेख,उपाध्यक्ष अथर्व गाढवे,रोहन गाढवे,प्रतिक बंडी,सार्थक मोकाटे,तेजस गाढवे,हिमांशु इंगोले,प्रतिक पानसरे,विनय बंडी,विशु मोहोळ,साहिल दळवी,तेजस कुंबरे,सोहेल शेख,समर्थ गाडेकर,प्रथम परिट,मोहित दोमाले,लोकेश गोपाळे,गणेश मांडके,सागर नेरे,मयुर भालिया,गणेश कारागीर,गोपाल गोलंडे,ओमकार भोसले,अथर्व कुलकर्णी,मंगेश कुलकर्णी,मयुर रापत्ती,श्रीरंग डोंगरे,साई ववले,निमिष दरणे,केदार सातपुते,पियुष घाटे,विश्वास खवळे उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे आयोजन शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी केले होते.