चंद्रपूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक – पत्रकार संघाच्या बैठकीकरिता सस्नेह निमंत्रण…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

            चंद्रपूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हा कार्यकारीणीस नियुक्ती पत्र देण्याची बैठक दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोज गुरुवारला सकाळी १०.३० वाजता शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे आयोजित केलेली आहे.

         बैठकीमध्ये मध्ये नियुक्ती पत्र देऊन डिजिटल मीडिया संघटनेची जिल्हा,तालुका कार्यकारिणी घोषित केली जाणार आहे.

          निवडीसाठी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब,राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य समन्वयक इकबाल शेख उपस्थित राहणार आहेत.

          ज्या कुणा पत्रकार मित्रांना जिल्हा,तालुका कार्यकारिणीत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधून बैठकीस उपस्थित राहावे.

         बैठकीस येताना आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन यावे.

          बैठकीस येणाऱ्यास येण्या जाण्याचा खर्च देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

          बैठकी करिता प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांच्या संपादक पत्रकार बांधवांना ज्यांची जिल्हा,तालुका डिजिटल मीडिया संघटनेत काम करण्याची इच्छा आहे अश्या सर्व पत्रकार बांधवांना सस्नेह नियंत्रण.

          ज्यांना कुणा पत्रकार बांधवांना जिल्हा,तालुका कार्यकारीत काम करावयाचे आहे त्यांनी चंद्रपूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम गेडाम मोबाईल नंबर ९९२१०२७१७८ या क्रमांकावर संपर्क साधून बैठकीस उपस्थित राहावे असे जिल्हा सचिव प्रशांत रामटेके कळवितात.