
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे शिवजयंतीच्या पर्वावर शिवपूर्णा महोत्सव व वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम महाविद्यालय परिसरात दिनांक 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रम घेऊन मोठया उत्साहात पार पडला.
विविध कार्यक्रमात माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा, संगित खुर्ची,लिंबू चमचा, लंगडी, रस्सी खेच, दोरीवरच्या उड्या, डिश डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा,पुष्परचना स्पर्धा, आंतरमहाविद्यालयिन वक्तृव स्पर्धा, खुली दौड, शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक इत्यादी विविध कार्यक्रम पार पडले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भैय्यासाहेब कडू, उद्घाटक डॉ. संदीप राऊत, स्वागताध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रविंद्र इचे तर प्रमुख उपस्थिती शिवव्याख्याते राहुल बरडे, नारायण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश देशमुख, राष्ट्रसंत गुरुकुल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष ढोके, हिवरा पूर्णाचे सरपंच शरद वाटाने,टाकरखेडच्या उपसरपंच सौ. पूनम ढोणे उपस्थित होते.
पारितोषिक वितरण व समारोपीय कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष सौ. रजनीताई कडू, सहसचिव सौ. सरोजनीताई हरणे, डॉ. रविंद्र इचे, संस्थेचे उपाध्यक्ष शरद विधाते,कोषाध्यक्ष सौ. माधवीताई वाडस्कर, चांदुर बाजार पं स चे माजी सभापती राजेश वाटाणे राजेश, भगवंतराव शिवाजीराव पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाभाऊ महाजन, आसेगावचे ठाणेदार संजय राठोड,आसेगावच्या सरपंच सौ.कांचनताई रघुवंशी, समाजिक कार्यकर्ते अजय तायडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिवपूर्णा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे डॉ.प्रविण सदार, डॉ.भारत कल्याणकर, डॉ.आशिष काळे, डॉ. सुवर्णा जवंजाळ, डॉ.हरीश काळे, प्रा.विपीन लिल्हारे, प्रा.अतुल चऱ्हाटे, प्रा.भुसारी, प्रा.मोने यांनी परिश्रम घेतले.