प्रितम जनबंधु
संपादक
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने सीएमपीएल पौनी २ त. राजुरा जि चंद्रपूर येथे तारीख १९ फेब्रुवारी २०२४ ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या प्रसंगी सुरजभाऊ उपरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांचे संचालन व प्रास्ताविक वाहन चालक कामगार संघटनेचे जिल्हा सचिव उमाकांत वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमर गौरकार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल शेंडे, प्रकाश कोडापे, प्रमोद थिपे, अमर गौरकार, गजानन हनुमंते, विजय निवलकर, नागोबा बोढे, अविनाश मंचलवार, सुरेश बोढे, सुरजभाऊ उपरे, उमाकांत वाघमारे, अजय मंगाम, राजेंद्र कुशवाह, विनय दुबे, महेश चंद्रवंशी, नारायण सिंह, सुशिल उराव, गोपाल मंचलवार, अंकुश नंदेश्वर, पंकज सिंग, अमन मरस्कोल्हे, रोहित सिंगम, गजराज सिंग, जितू साथी, जितेंद्र पटेल, आशिष, राजेश साहनी, आमटी, अनमोल पासवान, पियुश सिंग, शिवराज सिंग, संजय, उमेश यादव, राजकुमार, अनमोल, अभिषेक इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.