कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी तालुक्यातील कन्हानमध्ये दिनाक 16 फरवरी ते 19 फरवरी या तारखेला विदर्भ अग्रो एक्स्पो कृषी प्रदर्शनीचे आयोजन किसान नेता संजय सत्येकार,भिवसन पेंच एफ.पी.ओ द्वारा करण्यात आले होते.
प्रदर्शनीचा उद्देश स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती व तसेच महिला व बेरोजगार युवक वस्वयंरोजगर, उद्योग धंदे विषयी चालना मिळावी हा होता.
वरील प्रमाणे सगळ्या बाबींना नजरेत ठेऊन ह्या चार दिवसाच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले. ह्या प्रदर्शनी मध्ये संपूर्ण राज्यभऱ्यातील 60 ते 70 विभिन्न प्रकारचे स्टाॅल लावले गेले होते.ज्या मध्ये नर्सरी रोप,बीज खाद,रासायनिक-सेंद्रिय कीडनाशक दवाई,ट्रॅक्टर कंपनी,शेती मध्ये कमी येणारे लहान-मोठे अवजारे,महिला बचत गटा मार्फत तयार केलेल्या वस्तू,असे अनेक प्रकारच्या तिथे स्टाॅल लावण्यात आले होते.
ह्या प्रदर्शनी मध्ये जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेरचे जवळ पास 10 ते 12 हजार लोकांनी भेट दिली.या चार दिवसीय कृषि प्रदर्शनी मध्ये कृषि सोबत अन्य प्रकारचे आयोजन पण केले होते.
ज्यात पहिल्या दिवसी कुस्ती स्पर्धा,दुसऱ्या दिवसी महिला सांस्कृतिक व उधोजक संमेलन व पारंपरिक वेषभूषा मध्ये कब्बडी स्पर्धा,तिसऱ्या दिवसी लावणी डान्स,चौथ्या दिवसी विभिन्य श्रेत्रा मध्ये सर्वश्रेष्ठ व समाज उपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
सोबतच प्रदर्शनी मध्ये सहभागी झालेले हजारो लोकांन मधील 20 भाग्यवान लोकांचे लक्की कुपन काडून नाव घोषित केले गेले.
कृषि प्रदर्शनीचे उदघाटन श्री. डी.एम.रेड्डीजी माजी आमदार यांनी केले,महिला संमेलनाचे उदघाटन सुकेशनीजी तेलगोटे सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले,कब्बड्डी स्पर्धा उदघाटन रामदासजी तडस खासदार व अध्यक्ष राज्य कुस्तीगीर संघटना यांनी केले.
या चार दिवासीय आयोजन मध्ये विशेष उपस्थिती लक्ष्मणजी मेहर,माजी जि.प.अध्यक्ष रश्मीताई बर्वे,गणेशजी कोहळे,माजी आमदार एस.क्यू. जमा,नरेशजी बर्वे,हुकूमचंद आमधरे,संकेतजी बावनकुळे,राजकुमारीजी राय,दयाराम भोयर,जि.प.सदस्य वेंकटजी कारेमोरे,तालुका कृषी अधिकारी अमराज्योतीताई गच्छे,रिताताई बर्वे,उपाध्यक्ष न.प. कन्हानचे योगेशजी रंगारी,ज्ञानेश्वरजी विघे पहलवान, मुख्य अध्यापिका विशाखाताई ठमके,कल्याणी सरोदे,कु. अनिकेत केशव पवार,अश्वमेघ पाटील,शिवाकृष्णा वाकलपूडी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कृषी प्रदर्शनीला यशस्वी करण्यासाठी अंजनाताई चकोले,विद्याताई सत्येकार,सावित्राताई ठाकरे,भारतीताई कुंभलकर,सारिकाताई ठाकरे,वैशाली ताई उके,किरण ताई जगणेकर,सुनीता ताई सतिकोसरे,भारती ताई दुणेदार,रंजना ताई कुंभलकर,प्रियंका ताई भोले,अनुराधा ताई कूथे,प्रांजली ताई तरार,दुर्गा ताई भारद्वाज,कुमुद ताई बावनकुळे, उषाताई कांबळे,करुणा ताई डोंगरे,चंद्रकला ताई गुडधे,रिताताई पटले,आरती ताई वघारे,मनीषा ताई चांभारे,पुष्पा ताई गावूत्रे,देवाशिष सत्येकार,सनत दसरे,कैलास खंडार,अरुन जगणेकर,गिरधर राऊत,संभा चकोले,राकेश चौहान,निलखंट मस्के,रिंकेश चौरे,श्रावण वतेकर,गौतम नितनवरे,आशिष सोनेकर,विजय सत्येकार,काशी पात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.