नीरा नरसिंहपूर दिनांक :21
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
– हर्षवर्धन पाटील यांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिल्या शुभेच्छा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार दि. 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्री.नारायणदास रामदास हायस्कूल तसेच कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय या दोन्ही ठिकाणी जाऊन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देत त्यांना शुभेच्छा दिल्या.परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.विद्यार्थ्यांशी यावेळी सुसंवाद करताना ते म्हणाले की परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने तसेच संयम बाळगून परीक्षेत मोठ्या गुणवत्तेने यशस्वी व्हावे.
श्री. नारायणदास रामदास हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर 905 विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या परीक्षा केंद्रावर 785 विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देत आहेत.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर परीसाठी मेहनत घेतली आहे. विद्यार्थ्यांनी संयमाने, शांततेने तसेच कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता आपण आपला पेपर सोडवावा.
यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, शकीलभाई सय्यद ,मोहन दुधाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे तसेच श्री. नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास फलफले, उपमुख्याध्यापक अशोक भोईटे, प्रा.औदुंबर चांदगुडे ,प्रा.दत्तात्रेय गोळे उपस्थित होते.