प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
चंद्रपूर:-
खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होतो. निर्णयक्षमता, सहानभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होतो आणि या गुणांच्या बळावर खेळाडू कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो.
यामुळे खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्याकरिता श्री महाकाली क्रीडा महोत्सवाचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजन करण्यात आले असुन त्यामध्ये राज्य स्तरीय हॉकी स्पर्धा हा खेळ २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ या तीन दिवसीय कालावधी साठी आयोजीत करण्यात आलेला आहे.
या राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धेचे अध्यक्षस्थानी किशोरभाऊ जोरगेवार, आमदार, चंद्रपूर मतदार संघ तथा अध्यक्ष यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर राहातील.तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कीर्तीवर्धन दीक्षित माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या हस्ते होणार आहे.
याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रविंद्रसिंग परदेशी पोलिस अधिक्षक चंद्रपूर,अविनाश पुंड जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर,उल्हास बोधे सब एरिया मॅनेजर,नागेश्वर राव एरिया पर्सनल मॅनेजर चंद्रपूर एरिया,आभा सिंग वणी एरिया डब्ल्यु. सी. एल.,पंकज गुप्ता शहर अध्यक्ष यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर,बॉबी दिक्षीत प्रो.प्रा. रामायण ट्रॅव्हल्स उपस्थित राहणार आहेत.
सर्व सन्माननीय मंडळी बरोबर हाॅकी खेळ प्रेमींची व शहरवासीयांची कार्यक्रमात उपस्थिती प्राथनिय असल्याचे आयोजकांचे विनंती पुर्वक नंम्र आव्हान आहे.
विनीत..
रुपेशसिंग चौव्हाण,सचिव, हॉकी प्रमोटर, असोसिएशन, चंद्रपूर, संदीप अध्यक्ष, अध्यक्ष, हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर, प्रेम गावंडे, अध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, अभिजीत दुर्गे, उपाध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, अनिल ठाकरे, हॉकी, ड्रीम चंद्रपूर, निलेश शेंडे कोषाध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसाकडे, शुभम साखरे, सिद्धार्थ सूर्यवंशी, आकाश इंगळे, अमोल सदभैय्ये, अखिल सागर, इजाज खान, बबन शेख, मधु जुमडे यांनी सर्व हॉकी खेळाडू व हॉकी प्रेमींना उपस्थित राहण्याच्या आव्हान केले आहे.