नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -बैलांचा शंकर पटानिमित्ताने सोनमाळा येथे रात्रीला मनोरंजनासाठी शाहिरा सुरमा बारसागडे व ज्ञानेश्वर वाघमारे यांची खडी गंमत आयोजित केलेली होती,परंतु सकाळी कार्यक्रम संपल्यानंतर मंडळातील आयोजक मंडळींनी ९ हजार रुपये देण्यास नकार दिला व कलावंताशी भांडण केले.
यामुळे कार्यक्रम स्थळावरून सर्व कलावंत साकोली पोलीस स्टेशनला आले आणि शाहिरा सुरमा बारसागडे यांनी संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांना फोनवर सर्व माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन साकोली येथे तक्रार नोंदविण्यात आली.
तक्रार दाखल होताच पोलीस विभाग यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजक समितीला पोलीस स्टेशन साकोली येथे बोलविण्यात आले व संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या सहकार्याने उरलेले ९ हजार रुपये आयोजन मंडळाकडून मागून दिले.
यानंतर कुठल्याही कलावंतांचा अपमान होणार नाही असे लिहुन घेतल्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले,केंद्रीय कोषाध्यक्ष मनोजभाऊ कोटांगले,जिल्हा संचालक विनोद मुरकुटे,साकोली संघटनेचे महासचिव ईश्वर धकाते,सचिव यशवन्त बागडे,उपाध्यक्ष संजय टेंभुर्णे,अरविंद शिवणकर, शोभिलाल सलामे,लाखनी अध्यक्ष संतोष फसाटे,विशाल जांगळे,फिरोज इलमकर,धम्मा वासनिक,नितीन रामटेके उपस्थित होते.