
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- येथील पंचायत समितीची सत्तासूत्रे पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात आली आहेत. काँग्रेसचे आठ तर तीन अपक्ष अशा अकरा सदस्यांचा पाठिंबा असलेले हेमणे हे बिनविरोध सभापती तर करुणा वालोदे यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली.
तहसीलदार निलेश कदम यांच्या उपस्थितीत निवड बैठक घेण्यात आली. यावेळी सभापतीपदासाठी काँग्रेसचे पं. स. सदस्य ललित हेमने यांचा एकमेव अर्ज आल्याने सभापतीपदी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
बैठकीला तहसीलदार निलेश कदम, गटविकास अधिकारी जाधव उपस्थित होते. निवडीनंतर सभापती हेमने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उमेश भांडारकर एच.बी.भांडारकर, सोनू बैरागी व समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींना शुभेच्छा दिल्या.