आंबेडकरी पक्षांची युती होणार!.. — युती बाहेर पडणाऱ्यावर आंबेडकरी समाज टाकणार बहिष्कार… — आंबेडकरी एकत्रिकरण बैठक संपन्न…

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली :- आंबेडकरी पक्ष गटातटात विभागल्याने मत विभाजणी होऊन आंबेडकरी राजकारणाचे अस्तित्व जवळपास संपले आहे. त्यामुळे नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील आंबेडकरी समूहाने देशात व राज्यात काय होते ते सगडे सोडून किमान गडचिरोली जिल्ह्यात आंबेडकरी पक्षाने एकत्रित येऊन निवडणूक लढवावी अस आवाहन करत सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच 19 जानेवारी रोजी गडचिरोली विश्राम गृहात पार पडली.  

         बैठकीला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून ज्येष्ठ नेते प्रकाश दुधे, प्रदीप भैसारे, बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम, सुधीर वालदे, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, संघटक हंसराज उराडे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवक आघाडी अध्यक्ष नितेश वेस्कडे, बामसेफ जिल्हाध्यक्ष वतीने भोजराज कान्हेकर, वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देव्हारे, सीताराम टेम्भूर्णे, केशव सामृतवार इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते. 

           बैठकीमध्ये सर्वानुमते common minimum agenda घेऊन, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक हितासाठी एकत्रित येऊन आगामी जिल्हा परिषद निवडणुका आपल्या राजकीय अस्तित्वासह ताकदीने लढवून आंबेडकरी राजकारणाचे अस्तित्व जिल्ह्यात निर्माण करावे असे ठरविण्यात आले.

          पहिल्या बैठकीत ज्या पक्ष संघटना अनुपस्थित होते त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करुन सहभागी केल्या जाईल. जे पक्ष – संघटना या एकत्रिकारणातून बाहेर पडतील त्या पक्षावर व नेत्यांवर संपुर्ण आंबेडकरी समाजाने बहिष्कार टाकायचे आवाहन यावेळी करण्यात आले.

            24 जानेवारी रोजी गडचिरोली मध्येच दुसरी आणि महत्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटना सहभागी होणार आहे. एकूण 3 बैठका घेण्यात येतील. ही पहिलीच बैठक संपन्न झाली. निर्णय घेण्यासाठी पक्षाचे सदस्य व काही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांची कोअर कमिटी तयार करण्यात येईल. आणि सर्व निर्णय चर्चा करून कोअर कमीटी घेईल. पुढील बैठकीमध्ये सर्व आंबेडकरी पक्षांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धनराज दामले, फुलझेले यांनी केले आहे.