ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- अकृषक जमिनीवरील लेआउट मधील प्लॉट खरेदी व विक्री ही मा. तहसीलदार गडचिरोली यांच्या अकृषक आदेशान्वये १४/०२/२०२३ पर्यंत जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक नोंदणी कार्यालय गडचिरोली यांच्या स्वाक्षरीने भूखंड खरेदी विक्रीची नोंदणी करण्यात येत होती.
परंतु शहरात अनेक बोगस लेआऊट ची कामे सुरु झाल्याने जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिनांक १५/०२/२०२३ परिपत्रक काढून दस्त मुद्रांक नोंदणी करण्यास स्थगिती दिली. तेव्हापासून आजतगायत मुद्रांक नोंदणी बंद आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. त्यामुळे सर्व लेआऊट चीं चौकशी करून केवळ बोगस लेआऊट धारकांवर कारवाई करावी परंतु सरसकट सगड्यांवर अन्याय करणे योग्य नव्हे. इतर जिल्ह्यात मा. तहसिलदार यांच्या अकृषक आदेशानुसार भूखंड खरेदी विक्री ची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.
त्यामुळे केवळ गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांवर हा अन्याय करण्यात आलेला आहे.
15/02/2023 पूर्वी गडचिरोली मध्ये भूखंडावर राष्ट्रीयकृत बँकेद्वारे गृहकर्ज मंजूर होऊन लोकांनी त्यावर रीतसर आपली घरे बनविलेली आहेत व बँकेचा हप्ता नियमित भरणे सुरु आहे.
परंतु सदर परिपत्रक आदेशानुसार सामान्य नागरिकांना शिक्षणासाठी, लग्न कार्यासाठी आवश्यक असल्यास कर्ज मिळणे कठीण झालेले आहे. सदर कार्यासाठी लागणारा पैसा कुठून उभा करावा? हा प्रश्न सामान्य नागरिकांस पडलेला असून त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे, त्या संबंधित सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिक हतबल झालेले आहेत अशा अनेक समस्यांमुळे सामान्य नागरिकांस नाहक अस सहन करावा लागत आहे.
या प्रकरणाचा सारासार विचार करून सामान्य नागरिकांची अडचण लक्षात घेता १५/०२/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांनी काढलेले परिपत्रक रद्द करून तहसीलदार यांच्या अकृषक आदेशानुसार भूखंडाची पूर्वरत मुद्रांक दस्त नोंदणी करण्यास परवानगी देण्यात यावी व सामान्य नागरिकांस वरील त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाप्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवा तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे, आशिष गेडाम आदी पदाधिकाऱ्यांनी केली.