चिमूर नगर परिषदेचा अतिक्रमणावर बुलडोजर…. — रस्ते रहदारीकरिता सुरळीत राहावेत हा दृष्टिकोन :-मुख्याधिकारी अर्चना वंजारी…

      रामदास ठुसे

नागपुर विभागीय प्रतिनिधी 

           चिमूर नगर परिषदेने चिमूर शहरातील मुख्य मार्ग, दुकान लाईनवरील पुर्वसूचना देऊनही अतिक्रमण हटविण्यात न आल्याने शेवटी नगर परीषदेने अतिक्रमणावर सोमवारला दि.20 पासून बुलडोझर चालविण्यास प्रारंभ केला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. अतिक्रमण हटविल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

                राष्ट्रीय महामार्ग आणि मुख्य बाजार पेठ दुकान लाईनमधील दुकान समोरील अतिक्रमण हटविण्याचे मंगळवार दि. 20 पर्यंत असे नोटीस न.प. ने दिले होते. अन्यथा अतिक्रमण न हटविल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे दुकानदाराला दिला होता. नोटीस अन्वये मंगळवारी सकाळपासूनच प्रशासनाच्या दोन टीमद्वारे अतिक्रमण काढणे मोहीम प्रारंभ झाली.

                अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत अतिक्रमण काढण्यात आले. त्यात अनेक दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःचे अतिक्रमण काढले. जेसीपीद्वारे नाली समोरील पायऱ्या फोडण्यात आल्या. काही दुकानदार यांचे साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण काढल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.

अतिक्रमण मोहिमेत न. प. मुख्याधिकारी अर्चना वंजारी, उपविभागीय पोलिस

            अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक संतोष बाकल, एपीआय मल्हारी ताळीकोटे, पीएसआय दीप्ती मरकाम, एपीआय निशांत फुलेकर, पीएसआय घनश्याम नवखरेसह 15 पोलिस अधिकारी, 60 पोलिस कर्मचारीसह चिमूर, भिसी, नागभीड, सिंदेवाही, शेगाव, वरोरा येथील पोलिस, दंगा नियंत्रण पथक व न.प. कर्मचारी उपस्थित होते.

            चिमूर शहरातील वर्दळीचा मार्ग बसस्थानक, तहसील, मुख्य महामार्ग या दोन्ही मार्गावरील रहदारी सुरळीत व्हावी म्हणून नगरपरिषद व चिमूर पोलिसांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून चहा, हाटेल, दुकानदार मुख्य मार्गावरील खुल्या जागेवर अतिक्रमण केले.

            त्यामुळे हे दोन्ही रस्ते आता मोकळे झाल्याने येथील रहदारी सुरळीत होणार आहे. फ्रेबुवारी महिन्यात बालाजी महाराज घोडा यात्रा असल्याने अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळे केलेले हे रस्ते रहदारीकरिता सुरळीत राहावेत हा दृष्टिकोन जपण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व समाजाभिमुख दृष्टिकोन जपावा, असे आवाहन चिमूरच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी केले आहे.