
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे दिनांक २० जानेवारी ला इतिहास राज्यशास्त्र व समाजशास्त्र या सामाजिक शास्त्राची एक दिवशीय चर्चासत्र संपन्न झाले.
NEP- २०२० अंतर्गत सामाजिक शास्त्रावरील परिणाम या विषयावर साधक बाधक चर्चा झाली. कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.श्याम खंडारे, अधिष्ठाता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे होते.
बिजभाषक म्हणून डॉ.संतोष बन्सोड समन्वयक डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र अमरावती यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, इतिहासाच्या संशोधकांनी इतिहास नवीन पध्दतीने मांडला पाहिजे.
अत्यंज समाजाचे दुःख सामाजिक शास्त्रानी पुढे आणले पाहिजे. वर्तमान काळात भारतीय संविधानाविषयी जनजागृती करावी लागेल.माध्यमानी अलिप्तता सोडली पाहिजे.हे विशद करून चिमूर क्रांतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दिपक यावले अध्यक्ष,गांधी सेवा शिक्षण समिती हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात चिमूर परिसरातील गौरवशाली इतिहास सांगून चिमूर क्रांती विशद केली.
प्राचार्य डॉ.आश्विन चंदेल यांनी मार्गदर्शनात सामाजिक शास्त्राची एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्याबाबत भूमिका मांडली. डॉ.नारायण कांबळे अध्यक्ष मराठी – समाजशास्त्र परिषद यांनी आपल्या मार्गदर्शनात NEP -2020 व सामाजिक शास्त्राचा सहसंबंध शास्त्रीय पध्दतीने मांडला.
इतिहासकार प्रा.डॉ.अजित कुमार न्यु दिल्ली, प्रा.डॉ. संजय गोरे व्यवस्थापन परिषद सदस्य गोंडवाना विद्यापीठ, प्रा.विनायकराव कापसे सचिव, प्रा.मारोतराव भोयर, कोषाध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर हे उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ.प्रफुल राजुरवाडे तर आभार प्रा. पितांबर पिसे यांनी केले. प्रा. डॉ.नितीन कत्रोजवार यांनी मान्यवर संशोधक लेखकांचे पुस्तक प्रकाशनात पुढाकार घेतला.एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.