
भारताच्या संविधानाने तुम्हाला दिलेल्या हत्याराचा (मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचे हत्यार) वापर या नितीभ्रष्टराजकीय पक्ष आणि त्यांचे नेते,त्यांच्याबरोबर तेवढ्याच प्रमाणात दोषी असलेले भ्रष्टाचारी सनदी अधिकारी व त्यांचे प्रशासकीय कर्मचारी, विवेकाला मारून टाकून निकाल देणाऱ्या न्यायालयीन यंत्रणेला,षंढ आणि नपुसंक व नेभळट झालेल्या गोदी माध्यमांना आणि लोकशाहीच्या नावावर ठोकशाही निर्माण करणाऱ्या RSS / नॉन बायलॉजिकल प्राणी / तडीपार म्हणजेच भाजप अर्थात वरील सर्वच संविधानविरोधी शक्ती यांना संपवण्यासाठी कधी वापर करणार?का कधी करणारच नाहीत?
असेच संपणार का?
यांनीच निर्माण केलेल्या तात्पुरत्या धार्मिक आणि अंधश्रद्धेच्या अफूच्या गोळीच्या नशेत पुढील पिढीसहित तुम्ही स्वतः संपणार का?
अर्थात आत्महत्या करण्यासाठी स्वतःचा गळफास घेण्यासाठी लागणारा दोरखंड स्वतःच वळणार का?
असे असेल तर…….
ते सुद्धा स्वातंत्र्य तुम्हाला संविधानाने प्रदान केले आहे!
जेंव्हा राजकारणातील नैतिकता संपुष्टात येऊन त्यांची स्वैराचारी भूमिका उफाळून वर येती.तेंव्हा जनतेला अराजकतेला,महागाईला,बेरोजगारीला सामोरे जाऊन,हतबल होऊन,राजकारण्यांच्या उपकारावर जगण्याची दयनीय दुरावस्था जेंव्हा येते.तेंव्हा तो देश,ती व्यवस्था शेवटच्या घटका मोजत असते.
ही वेळ या देशात कधीच येऊ नये म्हणूनच क्रांतिकारक आणि महापुरुषांनी देशाला परकी्यांच्या गुलामीतून सोडवून गुलामीत कधीच जाऊ न देण्यासाठीची सोय भारताचे संविधान निर्माण करुन केली…
परंतू ,3 टक्केवाल्या RSS वादी संविधानविरोधी अर्थात मनूवाद्यानी बहुजनांनाच कूसांस्कृतिक गुलाम बनवून बहुजनांच्या हातून बहुजनांचा काटा काढला!
तरी सुद्धा अजूनही बहुजनांना जाग येत नाही.याचे आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही.जो समाज या ब्राह्मणी कू प्रवृत्तीला प्रखर विरोध आचरणातून करतो.तोच समाज संविधानवादी,विवेकवादी,विज्ञानवादी,मानवतावादी बणतो.
अशाच भारतीय समाजाची निर्मिती होण्याची अपेक्षा महापुरुषांनी केली होती.परंतू , शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार असतांना सुद्धा तसेच ” माणूस “बनण्याचे माध्यम असतांना सुद्धा त्या शिक्षणाचा वापर केवळ कोणत्याही मार्गाने पैसा आणि त्यातून भौतिक सुखे प्राप्त करण्यासाठी केला गेल्यामुळेच या देशाची ही दुरावस्था झाली.त्याला खतपाणि घालण्याचे काम या व्यवस्थेने साढेतीन टक्केवाल्यांच्या ईशाऱ्यावर केले!
म्हणून आमचा देश आणि आम्ही लवकरच संपन्याच्या मार्गावर आहोत.
हे जर आजही टाळायचे असेल,तर…..
“संविधान जागृती देशाची प्रगती,याशिवाय अन्य पर्याय नाही….
आवाहनकर्ता…
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद,7875452689…