केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यासह इतरांवर विविध कलमान्वये फौजदारी कारवाई संबंधाने सुनावणी १ फेब्रुवारीला… — घटना अभ्यासक विनोद खोब्रागडे यांनी अभ्यासपूर्ण केली मांडणी….

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

       मा.विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा यांच्या न्यायालयात,केंद्रीय गृहमंत्री श्री. अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा प्रकरणात सुनावणी झाली.पुढील सुनावणी पुन्हा दिनांक ०१/०२/२०२५ ला ठेवन्यात आली आहे.

        फिर्यादी विनोदकुमार खोब्रागडे यांनीच दस्तऐवज पुराव्यानिशी आर्गुमेंन्ट करुन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली व FIR रजीष्टर करून सखोल चौकशी करन्याचे आदेश देण्याची मागणी न्यायालयात केली आहे.

        अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारणा २०१६ चा कलम ४(३)(r) नुसार व भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चा कलमानुसार,व इन्फारमेशन टेक्नॉलॉजी कलम ६४ नुसार FIR रजीष्टर करून कारवाई ची मागणी आज न्यायालयात केली आहे.

        भारत सरकारचे राजपत्र दिनांक ०१/०१/२०१६ मध्ये कलम ४(३)(r) नुसार कुठल्याही ठिकाणी,सार्वजनिक दिसेल,अशा ठिकाणी,SC,ST, जातीच्या व्यक्तीचा हेतूपुरस्सर, जानीवपुर्वक अवमान करता येत नाही असा नविन कायदा आहे.याबाबत सर्व न्यायमूर्ती यांना दस्तऐवज पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.

          केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांच्या विरुद्ध,मा.स्पेशल कोर्ट,विशेष जिल्हा व सत्र न्यायमूर्ती वरोरा यांच्या न्यायालयात,अट्रासिटीचा कलम १४(१) व ४ (३)(r) तसेच भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ व इन्फारमेशन टेक्नॉलॉजी कलम ६४ नुसार फौजदारी खटला दाखल झाला आहे.

       फौजदारी खटला क्रमांक ०२/२०२५ असुन पुढील सुनावणी दिनांक ०१/०२/२०२५ ला ठेवन्यात आली आहे.

        भारतातील,केंद्रीय गृहमंत्री यांच्या वर फौजदारी खटला दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.यामुळे भारत सरकार,शासन,प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

       फिर्यादी खुद्द विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे हे पटवारी असून जबाबदार व जागृत नागरिक आहेत.तद्वतच ते कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक आहेत.

        संविधानीक पदावर असलेले केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी खटला दाखल होणे ही भारतातील पहिलीच केस आहे.

       एक लक्षात घ्या,अनुसूचित जमाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारणा दिनांक १/१/२०१६ कलम ४(३)(r) नुसार सार्वजनिक दृष्यातील “कोणत्याही ठिकाणी”अनुसूचित जाती जमाती व्यक्तीचा जानीवपुर्वक जानुन बुजून अपमान करणे,अपमानित करण्याचा दृष्ट हेतुने बोलने हा दखलपात्र गुन्हा आहे.

         कोणत्याही ठिकाणी,हे अपशब्द महापुरुषांच्या विरुद्ध बोलता येत नाही,म्हणून जरी केंद्रीय गृहमंत्री श्री.अमीत शहा यांनी संसद मध्ये अपशब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर बदल बोलले असले तरी,ते नविन कायद्यानुसार अट्रासिटीचा कलम ४(३)(r) नुसार गुन्हा पात्र आहे.

        intentionally Insults intinidates with intent to homiliate Menber sc/st Tribe “any place” Within Public View..‌ 

      सविस्तर असे आहे की,आरोपी केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार चे ना.श्री.अमीत शहा यांच्यासह जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर,श्री.विनय गौडा जी.सी. IAS अधिकारी,पोलिस अधीक्षक,श्री.मुमक्का सुदर्शन IPSअधिकारी,चंद्रपूर,उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा कु.नयोमी दशरथ साठम मॅडम वरोरा IPS अधिकारी,ठाणेदार श्री.अजिक्यं तांमडे वरोरा PI यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे अट्रासिटीचा कलम ४ नुसार व इन्फारमेशन टेक्नॉलॉजी कायदा कलम ६४ नुसार,व भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चा कलम ६१(२),१९९,२९८,३१६(५),३१८(१), ३३५,३३६(३),३४०(१),३४०(२),व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ चां कलम १९९,१७५(३),१७३(४)(ख) नुसार फौजदारी कारवाई साठी विशेष जिल्हा व सत्र वरोरा यांच्या न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल केली आहे.दिनांक ०१/०२/२०२५ ला सुनावणी आहे.

       एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य अर्थात भारतीय संविधानाचे राज्य आहे मनमानीचे नाही.या भारत देशात कायद्यापुढे कुणीही मोठा नाही.

      सरकार कडून पगार घेणारे जो कुणी लोकप्रतिनिधी व अधिकारी हे सर्व लोकसेवक आहेत,म्हणजे जनतेचे सेवक आहेत,नौकर आहेत.

       कायद्याचा बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर कामे करणे,किंवा एखाद्या महापुरुषांच्या अवमान होईल असे अपशब्द वारंवार बोलून अवमान करणे,व ते इलेक्ट्रॉनिक मीडिया चां माध्यमातून प्रसारित करणे समाज बांधवांचा भावना दुखावणे हा “दखलपात्र” गुन्हा आहे.

       केंद्रीय गृहमंत्री श्री अमीत शहा यांनी दिनांक १८/१२/२०२४ रोजी कायदेपंडित ज्ञानाचे प्रतीक विश्वरत्न,भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर करोडो करोडो पीडित,वंचित,शोषित,दलित,यांचे दैवत असलेल्या महापुरुषांच्या बदल एकेरी शब्द आजकाल एक फॅशन झाले आहे,आंबेडकर -आंबेडकर- आंबेडकर -आंबेडकर- आंबेडकर -आंबेडकर हे फॅशन झाले आहे,इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे बेताल वक्तव्य संसद भवन मध्ये पीटिशन अधिकारी यांच्या समक्ष हातवारे करून,बाॅडी लांगवेज वेगळीच बोलत असताना त्यांच्या पक्षाचे खासदार हसत होते,व हे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये लाइव्ह वायरल झाले,व करोडो करोडो समाज बांधवांचा भावना दुखावल्या गेल्या,हा गुन्हा केंद्रीय गृहमंत्री श्री अमीत शहा यांनी केला आहे.

     संपूर्ण राज्यात,महाराष्ट्रात,भारतात,नाही तर देश विदेशातअमेरिकेत सुद्धा आंदोलन,मोर्चा,निषेध,निवेदन,समाज बांधवांनी देऊन कारवाईची मागणी केली,जेव्हा कुठेच फौजदारी कारवाई झाली नाही तेव्हा विनोदकुमार खोब्रागडे यांनी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली व फौजदारी पीटिशन खटला दाखल केला आहे.

      पोलिस प्रशासन व जिल्हा दंडाधिकारी यांना गंभीर रिपोर्ट देऊनही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही व आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांनाही सह आरोपी केले आहे.

      केंद्रीय गृहमंत्री भारत सरकारचे श्री अमीत शहा म्हणतात,रिपोर्ट दिल्यानंतर तीन दिवसांत पोलिस प्रशासन यांनी अँक्शन घ्यावी असे निर्देश दिले होते व आहे.

       तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार श्री.सुशीलकुमार शिंदे यांनी आदेश दिले तक्रार दिल्यानंतर पोलिस प्रशासन यांनी कारवाई केली नाही तर पोलिस प्रशासन यांचावर फौजदारी कारवाई करावी असे निर्देश दिले होते.

      सुप्रीम न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती म्हणतात,क्रिमिनल केस नंबर 68/2008 मध्ये तक्रार देऊन सात दिवसांत पोलिस प्रशासन यांनी कारवाई केली नाही तर पोलिस प्रशासन यांच्यावर गुन्हा दाखल करावे.

      हे सर्व पुरावे घेऊन प्रथम पोलिस प्रशासन यांना मा.केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार श्री.अमीत शहा यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिली,तीन दिवस होऊनही कारवाई केली नाही.

       नंतर जिल्हादंडाधिकारी साहेब चंद्रपूर यांचा कडे रिपोर्ट केली त्यांनी सुद्धा निर्देश व कारवाई केली नाही.

       अखेर जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे फौजदारी खटला विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक यांनी फौजदारी खटला दाखल केला आहे.

*****

जनहितार्थ जारी…

    फेक न्युज पासून समाज बांधवांनी सावधान राहावे,शहानिशा केल्याशिवाय कुठलीही पोष्ट वायरल करू नका…

*****

टिप:- वरिल प्रेस नोट जशीच्या तशी फारवड करु शकता,मात्र तोडफोड करुन,आपल्या जवळचे शब्द वापरून पोष्ट वायरल करु नका,व चुकीचा म्यॅसेज समाजात वायरल करु नका..‌

*****

जनहितार्थ जारी..

     समाजहितासाठी,देशहितासाठी, राष्ट्रबांधनीसाठी,लोकशाही बळकट करण्यासाठी,संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे…

     धन्यवाद!

*****

  या प्रकरणात संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील,महाराष्ट्रातील, भारतातील,जनतेचे लक्ष लागलेले आहे…

विनोदकुमार खोब्रागडे 

           वरोरा 

संपर्क क्रमांक.‌‌.

९८५०३८२४२६…

८३२९४२३२६१….