16,17 फेब्रुवारी ला पिंडकेपार येथे विदर्भ स्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने 16,17 फेब्रुवारी ला पिंडकेपार येथे विदर्भ स्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे.

          त्या निमित्ताने नियोजन बैठक साकोली येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

         दोन दिवसीय कार्यक्रमात कव्वाली प्रबोधन, तमाशा, गोंधळ, लावणी ग्रुप, आदिवासी डान्स, कीर्तन, भारुळ, डहाका वादन,भजन, कलापथक ,नाटक इत्यादी वेगवेगळ्या लोककला सादर होणार आहेत.

         विविध लोककला मधील विशेष कलावंताचा सत्कार सुद्धा होणार आहे अस नियोजन बैठकीमध्ये ठरविण्यात आले.

           त्या मध्ये प्रबोधनकार कला साहित्य संघटना जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, साकोली तालुका अध्यक्ष धनंजय धकाते, ता.समनव्यक उमेश भोयर, सचिव यशवन्त बागडे, निलाराम बागडे, संदीप नागदेवे, जासूद ठाकरे उपस्थित होते.