युवकांनी वाईट व्यसनाचा त्याग करावा :- राजु देवतळे… — भिसी येथील वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

     शुभम गजभिये 

       विशेष प्रतिनिधी 

        श्री साई विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच डॉ. आशिष मोहरकर कला विज्ञान विज्ञान महाविद्यालयच्या संयुक्त पणे आयोजित सांस्कृतिक वार्षिक स्नेहसंमेलनच्या उदघाटन प्रसंगी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे यांनी विचार व्यक्त करीत असताना म्हणाले की आजचा युवक वाईट व्यसनाकडे जात असल्याची खन्त व्यक्त करीत युवकांनी आपल्या कला कौशल्याचा विकास करीत विद्यार्थी यांनी अहंकार करू नये असे सांगत तुकडोजी महाराज यांच्या ओव्या सांगत युवकांनी वाईट व्यसन सोडून देण्याचे सांगितले.तसेच आमदार बंटीभाऊ भांगडिया विदेशात असल्यामुळे त्यांनी पाठविलेला संदेश सांगितला.

            यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजभे, डॉ.आशिष मोहरकर, निलेश गभणे, किशोर मुंगले,पंकज गाडी वार, किशोर नेरलावार, ठाणेदार चांदे,बोधाने, प्राचार्य गभणे आदी उपस्थित होते.