
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा शेतीमाल तयार झाला की परदेशातून शेतीमाल सर्व प्रकारचा आयात करून आपल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शेती मालाचे भाव पाडून महाराष्ट्रातील शेतकरी त्रिमूर्ती सरकारने आर्थिक दृष्ट्या कमकुवत केला आहे असा गंभीर आरोप शिवसेनेचे विभाग प्रमुख समीर बल्की यांनी केला आहे.
केंद्र व राज्य सरकारचे आयात के निर्यात धोरण शेतकऱ्यासंदर्भात चुकीचे आहे. गेले चार बर्षापासून शेतीमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी विक्री होत असल्यामुळे शासनाचे बाजारपेठ वर नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाशी आर्थिक दृश्या खेळ खेळत आहे.
यावर केंद्र व राज्य सरकारचे शेतीमाला संदर्भात त्रिमूर्ती सरकारचे चुकीचे धोरण आहे. आरोप केला आहे. विभाग प्रमुख समीर बल्की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नियंत्रण नाही परदेशातील व्यापाऱ्याकडून संबंधित विभागाच्या प्रामुख्याला टक्केवारी दिली जाते व बाजारपेठेतील संपूर्ण भाव पाडले जातात शेतकन्यांच्या माल कमी दराने बाजारपेठेत विकला जातो.
२०२० पासून आज पर्यंत माय बाप शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. नुकसान भरपाई म्हणून अतिवृष्टी व दुष्काळाचे पैसे मिळाल नाहीत. विविध शेती अवजाराचे व ठिबकचे अनुदानही मिळाले नाही.
केंद्र व राज्य सरकारने दिलेले अनुदान व पिक विमा कंपन्याकडून तिन्ही माजी कृषि मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेऊन शेतकऱ्याला फसविले असल्याचा आरोप शिवसेनेचे आंबोली विभाग प्रमुख समीर बल्की यांनी केला आहे.
देशामध्ये व राज्यात अनेक वेळा शेतकरी बांधवांनी आंदोलने केली,तरीही शासन गांभीर्याने दखल घेत नाही. दिल्ली मध्ये तर खूप मोठे प्रचंड शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे.७ ०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा आंदोलना दरम्यान मृत्यू झाला आहे.
असे असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितसंबंधाने गांभीर्यपूर्वक नियोजन केले नाही व त्यांच्या हितसंबंधांने कोणतीही बाब न हाताळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाचे विरोधात राग आहे.शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने शेतीमालाला अनुसरून,”स्वामीनाथ आयोगाच्या निकषानुसार किमान आधारभूत हमी भावाच्या कायद्याची अंमलबजावणी करुन शेतीमालाच्या भावा संदर्भात कोणतेही पाहूल उचललेले नाही.
शेतीमाल तयार झाल्यावर निर्यात परवानगी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
केंद्र व राज्यातील निष्क्रिय सरकार शेतकऱ्यांसाठी कर्दन काळ असल्याचा आरोप केला आहे.शिवसेनेचे विभाग प्रमुख समीर बल्की यांनी केला आहे.