रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील भिसी येथील श्रीहरी गजानन जिनींग येथे दि २० जानेवारीला भारतीय कपास निगम (सिसीआय) चा कापुस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय कपास निगमचे केंद्रप्रमुख प्रकाश पटेल सहयोगी निलेश राठवा,प्रमोद काकडे,श्रीहरी गजानन जिनींगचे संचालक धनराजजी मुंगले,धिरज मुंगले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजु मेश्राम उपस्थित होते.
या कार्यक्रमा प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आले.कृषी उत्पन्न बाजार समिती व श्रीहरी गजानन जिनींग तर्फे मान्यवरांचा तसेच शेतकरी राजु बोरकर भिसी,भानुदास नागदेवते गदगाव,गौतम शंभरकर गदगाव प्रथम क्रमांक लावलेल्या तिन शेतकरी बांधवांचा व चालकांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जिनींगच्या कापुस खरेदी भावापेक्षा सुमारे ३०० रुपये प्रती क्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने भारतीय कपास निगमला कापुस विकल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु यासाठी सन २०२४ -२५ चा पिकपेरा नमुद असलेला सातबारा, नमुना आठ व आधारकार्ड सोबत आनने अनिवार्य असल्याचे पटेल यांनी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग भिमटे यांनी केले या कार्यक्रमाला उमेश बोमेवार,सीसीआय चे मापारी तुषार कडवे व जिनींगचे सर्व कर्मच्यारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.